29.3 C
Mumbai
Monday, November 2, 2026
घरविशेषकॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांचे करिअर संपले!

कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांचे करिअर संपले!

माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांची कठोर टीका

Google News Follow

कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांनी पोलिसांना शांतता राखण्यासंदर्भात बॉण्ड भरून दिल्यानंतर त्यावर आता टीका होऊ लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी कॉक्रोच पार्टीचा खरपूस समाचार घेतला आहे.  काटजू यांनी अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या कारकिर्दीवर गंभीर टिप्पणी केली आहे. सीजेपीच्या नेत्यांनी पीस बॉण्डवर स्वाक्षरी करून आपली कारकीर्द संपवली आहे, असे काटजू यांनी म्हटले आहे. आता त्यांनी या बॉण्डचे उल्लंघन करून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना तुरुंगात पाठवले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सौरभ दास आणि आशुतोष रांका हे आतापर्यंत केवळ एका आठवड्यासाठी तुरुंगात गेले होते. मात्र, आता त्यांनी आंदोलन केले, तर पोलिस त्यांना दीर्घकाळासाठी तुरुंगात पाठवतील. त्यामुळेच ते आंदोलन करण्यास घाबरत आहेत, असे काटजू यांनी म्हटले. निवृत्तीनंतर अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या काटजू यांनी सीजेपी नेत्यांनी पीस बॉण्डवर स्वाक्षरी करण्याच्या कृतीची तुलना ‘माफीनाम्या’शीदेखील केली.

एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत माजी न्यायमूर्ती काटजू म्हणाले की, सीजेपीच्या नेत्यांची प्रतिमा आता पळ काढणाऱ्यांसारखी झाली आहे. पीस बॉण्डवर स्वाक्षरी केल्यामुळे जनता त्यांच्यावर यापुढे विश्वास ठेवणार नाही. काटजू म्हणाले, “ज्या लोकांनी पीस बॉण्डवर स्वाक्षरी केली, त्यांची कारकीर्द संपली आहे. जनता आता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण त्यांची प्रतिमा पळ काढणाऱ्यांसारखी झाली आहे.”

हे ही वाचा:

भारतीय नागरिक असल्यासारखे वागू नका!

‘इंडी’ आघाडीच्या रॅलीमुळे दिल्लीतील व्यापाऱ्यांना ११ हजार कोटींचा फटका

रचिन रविंद्र, मार्क चॅपमन वनडे मालिकेतून बाहेर

प्रदर्शनापूर्वीच ‘रामायण’च्या ११ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

आता अनेक महिन्यांसाठी तुरुंगात जावे लागेल

काटजू यांनी पुढे सांगितले, “पीस बॉण्डचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही लेखी स्वरूपात असे वचन दिले आहे की, यापुढे कधीही आंदोलन करणार नाही. कारण तुम्ही आंदोलन केले, तर पोलीस म्हणतील की तुम्ही शांततेचा भंग करत आहात. तुम्ही पीस बॉण्डचे उल्लंघन केले, तर तुम्हाला दीर्घकाळासाठी तुरुंगात डांबले जाईल. आतापर्यंत सौरभ दास आणि आशुतोष रांका हे केवळ एका आठवड्यासाठी तुरुंगात होते. आता त्यांना अनेक महिन्यांसाठी तुरुंगात जावे लागू शकते.”

ते पुढे म्हणाले, “आता हे लोक तुरुंगात जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे सीजेपी आता संपली आहे. पूर्णपणे संपली आहे. पीस बॉण्डवर स्वाक्षरी करून त्यांनी आपला कणाच मोडून घेतला आहे. त्यांनी स्वतःची कारकीर्द संपवली आहे.”

ते म्हणाले, “सुरुवातीला सीजेपीने धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावेळी मी म्हटले होते की, एक शिक्षणमंत्री जाईल आणि दुसरा येईल. त्यामुळे काय फरक पडणार आहे? यामुळे लोकांचे जीवनमान चांगले होणार आहे का? त्यांचे म्हणणे होते की, पेपरफुटी होत आहे, त्यामुळे ते राजीनाम्याची मागणी करत आहेत. मी त्यांना सांगितले की, पेपरफुटीचे कारण भ्रष्टाचार आहे. या व्यवस्थेतून भ्रष्टाचार दूर होणार नाही. तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांना कितीही हटवले आणि त्यासाठी कायदाही केला, तरी भ्रष्टाचार असेपर्यंत पेपरफुटीच्या घटना घडतच राहतील.”

ते पुढे म्हणाले, “आता या लोकांनी ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. एक जाईल आणि दुसरा येईल. पण त्यामुळे सामान्य लोकांचे जीवनमान उंचावणार आहे का?”

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा