30 C
Mumbai
Tuesday, November 3, 2026
घरस्पोर्ट्ससिंधू-लक्ष्यची पदकांची कमाई; खेळाडूंच्या खिशाला मात्र कात्री!

सिंधू-लक्ष्यची पदकांची कमाई; खेळाडूंच्या खिशाला मात्र कात्री!

Google News Follow

जर्मनीतील हायलो ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी एकेरीची जेतेपदे पटकावत भारताचा गौरव वाढवला. मात्र, या यशामागे भारतीय बॅडमिंटनपटूंचा संघर्षही समोर आला आहे. युरोप दौऱ्यातील चार स्पर्धांसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साई) निधी उपलब्ध न झाल्याने अनेक खेळाडूंना स्वतःच्या खर्चाने स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे लागले. प्रवास, निवास आणि भोजनाचा खर्चही खेळाडूंनी स्वतःच उचलला.

फिनलंड, डेन्मार्क, फ्रान्स आणि जर्मनीतील स्पर्धांसाठी भारतीय संघाच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजूर झाला नाही. ६ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या आर्क्टिक ओपन स्पर्धेच्या काही दिवस आधीच खेळाडूंना निधी मिळणार नसल्याचे कळवण्यात आले. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळही मिळाला नाही.

ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू हिने या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले. फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठणाऱ्या सिंधूने काही खर्च स्वतः केला, तर ‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’ या संस्थेनेही तिला मदत केली. निधी न मिळाल्याने स्पर्धेतून माघार घेण्याऐवजी खेळावर लक्ष केंद्रित करण्याला प्राधान्य दिल्याचे तिने सांगितले.

आर्थिक अडचणींचा परिणाम खेळाडूंच्या तयारीवरही झाला. काही खेळाडूंना प्रशिक्षकांना सोबत नेणे शक्य झाले नाही. जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकाच्या अकाने यामागुचीला फ्रेंच ओपनमध्ये पराभूत करणाऱ्या अश्मिता चालिहाला सहकारी इशाराणी बरुआने मार्गदर्शन केले. तर डेन्मार्क ओपनमध्ये तन्वी शर्माला प्रशिक्षकाशिवाय खेळावे लागले.

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या निराशाजनक कामगिरीमुळे निधी रोखण्यात आला का, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, आशियाई क्रीडा स्पर्धेतील निकालाचा या निर्णयाशी संबंध नसल्याचे साईच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. भारतीय बॅडमिंटन संघटनेने निर्धारित मुदतीत निधीचा प्रस्ताव सादर न केल्यामुळे आर्थिक मदत उपलब्ध झाली नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा