30 C
Mumbai
Tuesday, November 3, 2026
घरस्पोर्ट्सन्यूझीलंडला धक्का; कॉनवे पहिल्या वनडेतून बाहेर!

न्यूझीलंडला धक्का; कॉनवे पहिल्या वनडेतून बाहेर!

Google News Follow

भारताविरुद्धच्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी सलामीवीर डेव्हॉन कॉनवे दुखापतीमुळे बुधवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात खेळू शकणार नाही. सरावादरम्यान डोक्याला दुखापत झाल्याने त्याला पहिल्या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे.

मंगळवारी ऑकलंडमधील ईडन पार्क येथे न्यूझीलंड संघाच्या सराव सत्रादरम्यान ही घटना घडली. झेल पकडण्याचा प्रयत्न करताना कॉनवेची वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीशी धडक झाली. या घटनेनंतर मैदानावरील वैद्यकीय पथकाने दोन्ही खेळाडूंवर तातडीने उपचार केले. कॉनवेच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याला पुढील तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीत त्याला कनकशन झाल्याचे स्पष्ट झाले.

न्यूझीलंड क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे कॉनवे पहिल्या वनडेत खेळू शकणार नाही. त्याच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवणार असून, मालिकेतील पुढील सामन्यांमधील त्याच्या सहभागाबाबत नंतर निर्णय घेतला जाईल. हेन्रीच्या प्रकृतीवरही लक्ष ठेवण्यात येत आहे.

न्यूझीलंडच्या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत कॉनवेची भर पडली आहे. अष्टपैलू मार्क चॅपमन आणि रचिन रवींद्र हे यापूर्वीच अनुक्रमे हॅमस्ट्रिंग आणि खांद्याच्या दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर झाले आहेत.

दरम्यान, यष्टिरक्षक आणि सलामीवीर टिम सेफर्टची पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी निवड करण्यात आली होती. मात्र, आता त्याचा संपूर्ण मालिकेसाठी न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. कर्णधार मिचेल सँटनरने कॉनवेच्या अनुपस्थितीत सेफर्टला संधी मिळण्याचे संकेत दिले आहेत.

कॉनवे हा वनडे क्रिकेटमधील न्यूझीलंडचा महत्त्वाचा फलंदाज आहे. ३५ वर्षीय डावखुऱ्या सलामीवीराने ४३ वनडे सामन्यांत पाच शतके आणि सहा अर्धशतकांसह १ हजार ६९२ धावा केल्या आहेत. नाबाद १५२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-२० मालिकेतील पराभवानंतर वनडे मालिकेत पुनरागमन करण्याच्या तयारीत असलेल्या न्यूझीलंडसाठी कॉनवेची अनुपस्थिती मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा