30.3 C
Mumbai
Tuesday, November 3, 2026
घरराजकारणआधी राहुल गांधींनी खासदारकीचा राजीनामा द्यावा!

आधी राहुल गांधींनी खासदारकीचा राजीनामा द्यावा!

अतुल भातखळकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Google News Follow

२०२४ ची लोकसभा निवडणूक बेकायदेशीर असल्याचा काँग्रेसचा दावा असेल, तर राहुल गांधी यांनी स्वतःसह काँग्रेसच्या सर्व ९९ खासदारांचे राजीनामे द्यावेत, असे आव्हान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिले आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (एसआयआर) काँग्रेसकडून सातत्याने अपप्रचार केला जात असून, या आंदोलनामागे देशात अराजकता पसरवण्याचे मोठे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. भाजपच्या ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ या उपक्रमांतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एसआयआर प्रक्रियेत १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. मात्र, या प्रक्रियेत मृत मतदारांची नावे हटवण्यात आली, कायमस्वरूपी स्थलांतर केलेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली आणि दुबार नोंदी असलेली नावे एकाच ठिकाणी ठेवण्यात आली, असे अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केले. मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्याची आवश्यकता काँग्रेसनेही वेळोवेळी व्यक्त केली आहे. मात्र, केरळ आणि तामिळनाडूमध्ये एसआयआरनंतर काँग्रेसला यश मिळाले, तेव्हा ही प्रक्रिया चांगली वाटत होती. आता मात्र त्याच प्रक्रियेवर आक्षेप घेतला जात आहे. हा काँग्रेसचा दुटप्पीपणा असल्याची टीका अतुल भातखळकर यांनी केली.

या आंदोलनामागे देशात अराजकता निर्माण करण्याचा हेतू असून, त्यासाठी परदेशी शक्तींची मदत घेतली जात असल्याचा गंभीर आरोपही आमदार भातखळकर यांनी केला. अभिनेता इम्रान खान याने एसआयआरविरोधी आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या निरीक्षणांचाही त्यांनी उल्लेख केला. इम्रान खान हा भारतीय नागरिक नसताना देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील आंदोलनात सहभागी झाला, यावरून काँग्रेसच्या आंदोलनाला देशाबाहेरील व्यक्तींचेही समर्थन मिळत असल्याचे दिसते, असे ते म्हणाले. न्यायालयाने या प्रकरणात इम्रान खान याच्यावर ताशेरे ओढले असून, अन्य देशात अशी कृती केली असती तर देश सोडावा लागला असता, असेही न्यायालयाने म्हटल्याचा दावा त्यांनी केला.

हे ही वाचा:

रशियाचा युक्रेनच्या शाळेवर दुहेरी हवाई हल्ला; २४ ठार

बीएसएफ जवानांवरील हल्ल्याप्रकरणी नऊ जणांना अटक

कनेक्टिव्हिटी वाढल्याने पुण्याच्या विकासाला चालना

दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड करा!

काँग्रेसकडून केली जाणारी ‘रिजिम चेंज’ची भाषा ही केवळ निवडणूक आयुक्तांना हटवण्यापुरती मर्यादित नसल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला. ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार ‘रिजिम चेंज’चा अर्थ लोकशाही मार्गाने न जाता सत्ताबदल करणे, असा होतो. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवणे हा केवळ वरवरचा मुद्दा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून हटवण्याचे मनसुबे यामागे आहेत. पुढे देशाची राज्यघटनाच बदलण्याचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा