30.5 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरस्पोर्ट्सएनओसीसाठी पीसीबी मागतेय भीक

एनओसीसाठी पीसीबी मागतेय भीक

Google News Follow

अबू धाबी टी-१० लीगमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या अडचणी वाढल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आपल्या खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यास तूर्तास रोख लावली आहे. प्रत्येक खेळाडूच्या एनओसीसाठी लीग आयोजकांनी १० हजार डॉलर (सुमारे ८.८ लाख रुपये) शुल्क द्यावे, अशी अट पीसीबीने घातली आहे. त्यामुळे ७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेतील पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, अबू धाबी टी-१० लीग व्यवस्थापनाने ३० सप्टेंबर रोजी खेळाडूंचा ड्राफ्ट पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या एनओसीसाठी अर्ज केला होता. मात्र, पीसीबीने ही शुल्काची अट स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधी समोर आणली. त्यामुळे फ्रँचायझींसमोर पेच निर्माण झाला आहे. काही संघ शुल्क भरण्याचा विचार करत आहेत, तर काहींनी पर्यायी खेळाडूंचा शोध सुरू केला आहे.

या स्पर्धेच्या ड्राफ्टमध्ये सहापैकी पाच संघांनी तब्बल १६ पाकिस्तानी खेळाडूंना आपल्या संघात निवडले आहे. यामध्ये नसीम शाह, शादाब खान, मोहम्मद आमिर, फखर जमान, इफ्तिखार अहमद, फहीम अशरफ आणि आझम खान यांसारख्या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. काही खेळाडू स्वतःच्या मानधनातून एनओसीचे शुल्क भरण्यास तयार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, अद्याप या प्रकरणावर तोडगा निघालेला नाही.

दरम्यान, पीसीबीने गेल्या महिन्यात नेपाळ प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठीही पाकिस्तानी खेळाडूंना एनओसी देण्यास नकार दिला होता. पाकिस्तान सुपर लीगला प्राधान्य देण्याच्या धोरणाचा भाग म्हणून परदेशी टी-२० लीगमधील खेळाडूंच्या सहभागावर बोर्डाचे नियंत्रण असल्याचे दिसून येते. त्यामुळे अबू धाबी टी-१० मधील पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग आता पीसीबीच्या निर्णयावर अवलंबून आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा