31.4 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरविशेषस्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात वीज; ४०० कुटुंबांची दिवाळी उजळणार

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात वीज; ४०० कुटुंबांची दिवाळी उजळणार

पश्चिम बंगालमधील चकदह गावात पहिल्यांदाच वीजजोडणी

Google News Follow

पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चकदह गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज पोहोचली आहे. तब्बल ७९ वर्षांनंतर गावात वीज आल्याने सुमारे ४०० आदिवासी कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदाची दिवाळी या कुटुंबांसाठी विशेष ठरणार असून, अनेक वर्षांपासून अंधारात असलेल्या घरांमध्ये आता विजेचा प्रकाश पोहोचणार आहे.

स्वातंत्र्यानंतर पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट, तृणमूल अशा अनेक पक्षांची सरकारे आली. वर्षोनुवर्षे सत्तेत राहूनही चकदह गावातील ४०० आदिवासी कुटुंबांच्या घरांपर्यंत वीज पोहोचू शकली नव्हती. अनेक पिढ्यांनी विजेच्या प्रतीक्षेतच आयुष्य काढले. मात्र, आता शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या काळात गावात पहिल्यांदाच वीज पोहोचली आहे. त्यामुळे तब्बल ७९ वर्षांनंतर गावकऱ्यांच्या घरात प्रकाश उजळणार आहे. आजवर अंधारात दिवाळी साजरी करणाऱ्या या कुटुंबांना यंदा खऱ्या अर्थाने प्रकाशाचा सण साजरा करता येणार आहे.

चकदह गाव हे तारकेश्वर विधानसभा मतदारसंघातील अष्टारदत्तपूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही वर्षांपूर्वी गावात विजेचे खांब उभारण्यात आले होते. मात्र, त्यावर वीजवाहिन्या टाकण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे खांब उभे असूनही गावकऱ्यांना वीज मिळू शकली नव्हती. गावात वीज नसल्यामुळे सर्वाधिक अडचणी विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागत होत्या. रात्रीच्या वेळी अभ्यास करणे मुलांसाठी कठीण होते. गावातील रहिवासी रूई बारी यांनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात वीज पोहोचल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सुमारे ४०० कुटुंबे आजवर विजेशिवाय राहत होती, असेही त्यांनी सांगितले.

स्थानिक भाजप आमदार संतू पान यांनीही या प्रश्नावर भूमिका मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गावात काही वर्षांपूर्वी विजेचे खांब बसवले होते; मात्र त्यानंतर वीजवाहिन्या टाकण्यात आल्या नाहीत. १९९७-९८ पासून गावकरी भाजपला मतदान करत असल्यामुळे तत्कालीन तृणमूल काँग्रेस सरकारने गावात वीज पोहोचवली नाही, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक प्रचारादरम्यान ग्रामस्थांना वीजजोडणी देण्याचे आश्वासन दिले होते. निवडून आल्यानंतर हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले होते.

हे ही वाचा:

महाभारत, अर्थशास्त्र, राजतरंगिणीची युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’मध्ये नोंद

नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा

हरमीत कौर ढिल्लन यांचा अमेरिकेच्या सहाय्यक ऍटर्नी जनरल पदाचा राजीनामा

पश्चिम बंगालमध्ये १,१५० जिलेटिन कांड्या, ९८९ डेटोनेटर्ससह २१ शस्त्रे जप्त

सुमारे महिनाभरापूर्वी जिल्हा वीज विभागाने घरांमध्ये मीटर बसवण्याचे काम सुरू केले. आतापर्यंत ५० घरांमध्ये नवीन मीटर बॉक्स बसवण्यात आले असून, १०० हून अधिक घरांना वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांना मोफत वीजजोडणी दिली जाणार असल्याचेही आमदारांनी सांगितले. चकदह गावातील सर्व कुटुंबे अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील असून, त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे वीज उपलब्ध झाल्याने केवळ घरांमध्ये प्रकाश येणार नाही, तर मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन जीवनही अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा