31.1 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरविशेषमुंबईच्या लोकसंख्येचे गणित बदलतेय? हिंदू, मुस्लिम मुलांच्या जन्माचे प्रमाण ३:२

मुंबईच्या लोकसंख्येचे गणित बदलतेय? हिंदू, मुस्लिम मुलांच्या जन्माचे प्रमाण ३:२

किरीट सोमय्यांनी मांडली आकडेवारी

Google News Follow

मुंबईतील हिंदू आणि मुस्लिम मुलांच्या जन्मदराचा मुद्दा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. मुंबईच्या लोकसंख्येच्या रचनेत बदल होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या बदलांचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष समिती स्थापन करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच, मुंबईचे मुस्लिमबहुल शहरात रूपांतर होण्याची शक्यता व्यक्त करत किरीट सोमय्या यांनी मुंबईला मुस्लिम बनवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही केला आहे.

किरीट सोमय्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यानुसार, मुंबईतील हिंदू आणि मुस्लिम मुलांच्या जन्माचे प्रमाण ३:२ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मुंबईतील काही भागांच्या लोकसंख्येत बदल झाल्याचेही त्यांनी सादर केलेल्या आकडेवारीतून म्हटले आहे. जन्मदरासंदर्भातील अधिकृत माहिती राज्य सरकारने जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०२५ मधील मुलांच्या जन्माची आकडेवारी सादर केली आहे. त्यानुसार, मुंबईत २०२५ मध्ये ७० हजार ३८० हिंदू मुलांचा, तर ४८ हजार ५५४ मुस्लिम मुलांचा जन्म झाला. याशिवाय, त्यांनी मागील पाच वर्षांची आकडेवारीही मांडली आहे.

किरीट सोमय्या यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार,

  • २०२५ मधील जन्म: ७० हजार ३८० हिंदू आणि ४८ हजार ५५४ मुस्लिम मुले
  • मागील पाच वर्षांतील जन्म: ३ लाख ३६ हजार ६२५ हिंदू आणि २ लाख २० हजार ७५४ मुस्लिम मुले
  • जन्माचे प्रमाण : हिंदू आणि मुस्लिम मुलांच्या जन्माचे प्रमाण ३:२ असल्याचा दावा

हे ही वाचा:

की-चेनवरील ‘जय श्रीराम’ची अक्षरे पुसून मुंब्र्यात विक्री

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात वीज; ४०० कुटुंबांची दिवाळी उजळणार

महाभारत, अर्थशास्त्र, राजतरंगिणीची युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’मध्ये नोंद

नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा

मुंबईच्या लोकसंख्येतील बदल आणि हिंदू-मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणाचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लोकसंख्याशास्त्रीय समिती (डेमोग्राफिक कमिटी) स्थापन करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. या समितीने जन्मदरासंदर्भातील आकडेवारीचा अभ्यास करावा, तिची पडताळणी करावी आणि सरकारने अधिकृत आकडेवारी जनतेसमोर मांडावी, असे त्यांनी म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा