29.8 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरक्राईमनामापर्यटनाच्या आड लश्करचे प्रशिक्षण; कराचीजवळील बेटावर दहशतवाद्यांचा वावर

पर्यटनाच्या आड लश्करचे प्रशिक्षण; कराचीजवळील बेटावर दहशतवाद्यांचा वावर

स्कूबा डायव्हिंग, पोहण्याचे प्रशिक्षण

Google News Follow

पाकिस्तानने आश्रय दिलेली लश्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना आता समुद्रमार्गे हल्ले करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. कराचीपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या चरणा बेटावर दहशतवादी पर्यटकांच्या वेशात सागरी कारवायांचे प्रशिक्षण घेत आहेत. स्कूबा डायव्हिंग, पोहणे आणि पाण्याखालील कारवायांचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

चरणा बेट स्कूबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध असून, याचाच फायदा घेत दहशतवाद्यांना पर्यटक म्हणून दाखवले जात आहे. हे दहशतवादी लश्करच्या ‘दावा मरीन विंग’ किंवा ‘सदा-ए-हुर्रियत’ या सागरी गटाचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी मरकझी मुस्लिम लीगचे (PMML) सदस्य त्यांना प्रशिक्षण देत आहेत. हा गट लश्करचा अप्रत्यक्ष गट मानला जातो. यापूर्वी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मंगला धरण आणि दहशतवादी तळांवरील जलतरण तलावांमध्येही लश्करचे सागरी प्रशिक्षण सुरू होते.

हे ही वाचा:

विश्वचषकापूर्वी विराटची शतकांची सेंच्युरी कठीण!

मर्सिडीज-बेंझची पुण्यात २०० कोटींची गुंतवणूक

सरन्याधीशांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केरळ काँग्रेसला अवमान नोटीस

‘जलसा’ बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी

२००८ च्या मुंबईवरील २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे प्रवेश केला होता. आता त्याच धर्तीवर हे प्रशिक्षण सुरू असल्याची शंका वर्तवली जात आहे. भारताच्या सुरक्षा यंत्रणा या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, मे २०२५ मध्ये ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने मुरीदके येथील लश्कर मुख्यालयासह नऊ दहशतवादी तळ आणि पायाभूत सुविधांवर हल्ले केले होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा