31.3 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरबिजनेसनवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १६ नोव्हेंबरपासून सुरू

नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १६ नोव्हेंबरपासून सुरू

कोकणवासीयांसाठी खूशखबर!

Google News Follow

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबई ते सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळादरम्यान येत्या १६ नोव्हेंबर २०२६ पासून थेट विमानसेवा सुरू होणार आहे. ‘फ्लाय९१’ या विमान कंपनीमार्फत ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून, या मार्गावरील विमान प्रवासासाठी तिकीट बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे आठवड्यातील सातही दिवस ही विमानसेवा सुरू राहणार असल्याने मुंबई महानगर प्रदेश आणि सिंधुदुर्ग यांच्यातील हवाई संपर्क अधिक मजबूत होणार आहे.

मुंबई ते चिपी विमानसेवा यापूर्वी सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळूनही तांत्रिक आणि अन्य कारणांमुळे ही सेवा अल्पावधीतच बंद पडली होती. त्यामुळे कोकणवासीयांना पुन्हा रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते. या मार्गावर नियमित विमानसेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर आता फ्लाय९१ कंपनीच्या माध्यमातून ही सेवा पुन्हा सुरू होत असल्याने प्रवाशांची प्रतीक्षा संपणार आहे.
हे ही वाचा:
बिस्किट बाजारात रिलायन्सची दमदार एन्ट्री

पुणे मेट्रोमुळे शहराच्या अर्थकारणाला नवी गती

अयोध्येवर आता कोणत्याही ‘मंथरा’, ‘मारीच’ची वाकडी नजर पडू देणार नाही

हवा गेलेला फुगा उडविण्याचा प्रयत्न |

या नव्या विमानसेवेचा सर्वाधिक फायदा मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांना होणार आहे. सण-उत्सव, लग्नसमारंभ, कौटुंबिक कार्यक्रम तसेच सुट्ट्यांच्या काळात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होईल. याशिवाय व्यावसायिक, उद्योजक आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठीही ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून या विमानसेवेची माहिती देत, “येवा, कोकण आपलोच आसा!” अशा मालवणी सादेने प्रवाशांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तारकर्ली, मालवण, देवगड, वेंगुर्ला आणि सावंतवाडी यांसारख्या पर्यटनस्थळांवर येणाऱ्या पर्यटकांसाठी नवी मुंबईमार्गे हवाई प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटन, स्थानिक व्यवसाय, हॉटेल उद्योग आणि रोजगारनिर्मितीलाही अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो. मात्र, या विमानसेवेचे सातत्य आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा टिकवून ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. नियमित सात दिवस सुरू राहणारी ही सेवा यशस्वी ठरल्यास कोकणच्या पर्यटन आणि आर्थिक विकासासाठी ती महत्त्वाचा दुवा ठरू शकते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा