31.8 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरदेश दुनियाभारताविरोधात एकत्र या! हाफिज सईदचा मुलगा बरळला

भारताविरोधात एकत्र या! हाफिज सईदचा मुलगा बरळला

भारतामुळे पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका असल्याचा दावा

Google News Follow

लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आणि २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार हाफिज मोहम्मद सईद याचा मुलगा हाफिज तल्हा सईद याने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानमधील राजकीय सभेत बोलताना त्याने भारताला पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी मोठे आव्हान ठरवले. तसेच पाकिस्तानमधील अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून भारताविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, यावेळी त्याने फाळणीपूर्वीच्या मुस्लिम लीगचा संदर्भ देत आपल्या राजकीय पक्षाला त्या पक्षाचा वारसदार असल्याचे म्हटले.

पाकिस्तान मरकजी मुस्लिम लीग (PMML) या पक्षाच्या निवडणूक सभेत बोलताना तल्हा सईदने आपल्या पक्षाची तुलना पाकिस्तानच्या निर्मितीसाठी आंदोलन करणाऱ्या तत्कालीन मुस्लिम लीगशी केली. १९४७ मध्ये पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्या मुस्लिम लीगचा वारसा आपलाच पक्ष पुढे नेत असल्याचा दावा त्याने केला. पाकिस्तानमधील विखुरलेल्या जनतेला एकत्र आणून एकसंध राष्ट्र उभे करण्याची क्षमता PMML मध्ये असल्याचेही तो म्हणाला.

यावेळी तल्हा सईदने पाकिस्तानला जगभरातील मुस्लिम समुदायाचा रक्षक म्हणूनही सादर करण्याचा प्रयत्न केला. जगभरातील मुस्लिम समाज पाकिस्तानकडे आशेने पाहतो आणि पाकिस्तान मुस्लिम उम्मतसह मक्का-मदिना या दोन पवित्र स्थळांचा रक्षक असल्याचा दावा त्याने केला. पाकिस्तानमधील अंतर्गत राजकीय मतभेदांचा फायदा भारत घेऊ शकतो, असे सांगत त्याने जनतेला भारताविरोधात एकजूट होण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा:

चिनी व्लॉगर्सकडून भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न?

पाकिस्तानी टीव्ही अँकरची पतीकडून गोळ्या झाडून हत्या

बालशोषणाचे २० हजार फोटो-व्हिडिओ बाळगल्याप्रकरणी सैफुद्दीन मलिकला अटक

गुरुग्राममधून वैध पासपोर्ट नसलेल्या १४ बांगलादेशींना अटक

कोण आहे तल्हा सईद?

हाफिज तल्हा सईद हा लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज मोहम्मद सईद याचा मुलगा आहे. भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने एप्रिल २०२२ मध्ये बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) त्याला वैयक्तिक दहशतवादी घोषित केले होते. तो लष्करच्या मौलवी विभागाचा प्रमुख असून, भारत आणि अफगाणिस्तानमधील हल्ल्यांसाठी भरती, निधी उभारणी आणि कट रचण्यात त्याचा सहभाग असल्याचे भारतीय गृह मंत्रालयाने म्हटले होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा