29.5 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरविशेषमुंबईत २५ नोव्हेंबरपर्यंत रॉकेट फटाके फोडण्यास बंदी

मुंबईत २५ नोव्हेंबरपर्यंत रॉकेट फटाके फोडण्यास बंदी

आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने निर्णय

Google News Follow

दिवाळीच्या काळात मुंबईत आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. मुंबई आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने हा निर्णय घेतला असून, ९ नोव्हेंबरपासून २५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक आणि खासगी अशा सर्व ठिकाणी या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.

दिवाळीच्या रात्री शहरातील विविध भागांत मोठ्या आगी लागल्या. यामध्ये झोपड्या, दुकाने, गॅरेज आणि व्यावसायिक इमारतींच्या काही भागांचे नुकसान झाले. यानंतर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

अतिरिक्त महापालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी हा आदेश जारी केला आहे. रॉकेट आणि आकाशात उडणारे फटाके इमारतींच्या छतावर, बाल्कनीत किंवा खिडक्यांमध्ये पडल्यास आग लागण्याचा धोका असतो. मुंबईतील दाट लोकवस्ती, उंच इमारती, झोपडपट्ट्या आणि अरुंद रस्त्यांमुळे हा धोका अधिक वाढतो, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये २०२७ ची जनगणना तूर्तास स्थगित

चिनी व्लॉगर्सकडून भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न?

पाकिस्तानी टीव्ही अँकरची पतीकडून गोळ्या झाडून हत्या

बालशोषणाचे २० हजार फोटो-व्हिडिओ बाळगल्याप्रकरणी सैफुद्दीन मलिकला अटक

ही बंदी निवासी इमारती, गच्ची, बाल्कनी, अंगण, पार्किंग आणि झोपडपट्टी परिसरांनाही लागू असेल. मात्र, रॉकेट व तत्सम आकाशात उडणाऱ्या फटाक्यांव्यतिरिक्त इतर फटाक्यांवर स्वतंत्र बंदी घालण्यात आलेली नाही. त्यांचा वापर विद्यमान नियम आणि न्यायालयीन आदेशांनुसारच करावा लागणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा