29.5 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरबिजनेसबांगलादेशमधून जागतिक बँका गुंडाळत आहेत किरकोळ बँकिंग व्यवसाय

बांगलादेशमधून जागतिक बँका गुंडाळत आहेत किरकोळ बँकिंग व्यवसाय

बँकिंग क्षेत्रावरील दबाव वाढल्याची माहिती अहवालात नमुूद

Google News Follow

बांगलादेशमधील जागतिक बँकांनी किरकोळ बँकिंग व्यवसायातून माघार घेण्यास सुरुवात केल्याने देशाच्या बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांच्या विश्वासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने बांगलादेशमधील आपला किरकोळ बँकिंग व्यवसाय विकण्याची योजना जाहीर केली आहे. यापूर्वी एचएसबीसीनेही तेथील किरकोळ बँकिंग व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

ढाका येथील वृत्तसंकेतस्थळ ‘प्रोथोम आलो’च्या अहवालानुसार, या निर्णयांमुळे जागतिक बँकांचा बांगलादेशच्या बाजारपेठेवरील विश्वास कमी होत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अहवालात म्हटले आहे की, बांगलादेशचे बँकिंग क्षेत्र सध्या अनेक गंभीर आव्हानांचा सामना करत आहे. यामध्ये अनुत्पादित कर्जे (एनपीएल), भांडवलाची कमतरता, कमकुवत कॉर्पोरेट प्रशासन, आर्थिक अनियमितता आणि ठेवीदारांच्या विश्वासाचे संकट यांचा समावेश आहे.

मात्र, जागतिक बँकांच्या व्यवसायात बदल करण्याची ही प्रवृत्ती केवळ बांगलादेशपुरती मर्यादित नाही. जगातील अनेक मोठ्या बँका अधिक नफा आणि गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता असलेल्या बाजारपेठांमध्ये आणि व्यवसाय क्षेत्रांमध्ये आपले भांडवल केंद्रित करत आहेत. असे असले तरी बांगलादेशमधील सध्याच्या बाजारपेठेतील परिस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

अहवालानुसार, राजकीय प्रभावाखाली दिलेली कर्जे, संबंधित पक्षांना करण्यात आलेले कर्जवाटप आणि मोठ्या कर्जबुडव्यांविरोधात प्रभावी कारवाईचा अभाव यामुळे बांगलादेशच्या बँकिंग क्षेत्रातील संस्थात्मक कमकुवतपणा उघड झाला आहे. बांगलादेश बँकेच्या आकडेवारीनुसार, २०२६ च्या मध्यापर्यंत देशातील एकूण बँकिंग कर्जापैकी जवळपास एकतृतीयांश कर्ज अनुत्पादित कर्जामध्ये रूपांतरित झाले होते. जागतिक बँकेनेही बांगलादेशच्या बँकिंग व्यवस्थेतील भांडवलाशी संबंधित कमकुवतपणाकडे लक्ष वेधले आहे.

हे ही वाचा:

बलुचमध्ये पाक सैन्याचे पाच जवान ठार

‘दिवाळीला खुशियों की ईद’ म्हणणाऱ्या खर्गेंवर भाजपचा निशाणा

गुरुग्राममधून वैध पासपोर्ट नसलेल्या १४ बांगलादेशींना अटक

इराणविरुद्ध युद्धाबाबत ट्रम्प सरकारमध्येच तोंडे वेगवेगळ्या दिशेला

अशा परिस्थितीत दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय बँकांनी किरकोळ बँकिंग व्यवसायातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये नकारात्मक धारणा निर्माण होऊ शकते. मात्र, या निर्णयांकडे बांगलादेशची अर्थव्यवस्था किंवा संपूर्ण बँकिंग क्षेत्रावरील आंतरराष्ट्रीय विश्वास पूर्णपणे संपल्याचे संकेत म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

अहवालानुसार, किरकोळ बँकिंग व्यवसायातून बाहेर पडणे आणि एखाद्या देशातून संपूर्ण व्यवसाय गुंडाळणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सध्या बांगलादेशच्या बँकिंग क्षेत्रासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे संस्थात्मक विश्वासार्हता पुन्हा निर्माण करणे. यासाठी बँकांच्या संचालक मंडळांवर पात्र आणि सक्षम व्यक्तींची नियुक्ती करणे, कर्जवाटप प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, संबंधित पक्षांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर नियंत्रण ठेवणे आणि थकीत कर्जांची वसुली करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा