29.5 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरस्पोर्ट्सवेस्ट इंडिजचा मालिकाविजय!

वेस्ट इंडिजचा मालिकाविजय!

Google News Follow

बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटी अनिर्णित राहिल्याने वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी जिंकली. सिलहट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशचा फलंदाज तौहीद हृदोयने नाबाद द्विशतक झळकावत सामन्याचा हिरो ठरण्याचा मान मिळवला.

पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजने बांगलादेशचा ८ विकेट्सने पराभव केला होता. त्यामुळे मालिका बरोबरीत आणण्यासाठी बांगलादेशला दुसरी कसोटी जिंकणे आवश्यक होते. मात्र, यजमान संघाला विजय मिळवण्यात अपयश आले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३५६ धावा केल्या. आमिर जंगूने १३३ धावांची शतकी खेळी केली, तर केविन विकहमने ६१ धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून हसन महमूदने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात बांगलादेशने पहिल्या डावात ३८६ धावा करत ३० धावांची आघाडी मिळवली. तौहीद हृदोयने ३५९ चेंडूंत ११ षटकार आणि २२ चौकारांच्या मदतीने नाबाद २४२ धावांची शानदार खेळी केली.

दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने ६ बाद ३९८ धावांवर डाव घोषित केला. कावेम हॉजने १४२ धावा ठोकल्या. केविन विकहमने ७८, तर ब्रँडन किंगने ६१ धावा केल्या.

विजयासाठी ३६९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशला अखेरच्या दिवशी ५९ षटकांत ४ बाद १८४ धावाच करता आल्या. तौहीद हृदोयने मुशफिकुर रहीमसोबत तिसऱ्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी करत संघाला सावरले. मात्र, खराब प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला आणि सामना अनिर्णित राहिला.

दोन्ही डावांत २४२ नाबाद आणि ८२ धावांची खेळी करणाऱ्या तौहीद हृदोयला सामनावीर पुरस्कार मिळाला. मालिकेत १६ विकेट्स घेणाऱ्या जोमेल वॉरिकनला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा