32 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरराजकारणमुंबई विमानतळावरील एकही आंतरराष्ट्रीय विमान नवी मुंबईत हलवणार नाही

मुंबई विमानतळावरील एकही आंतरराष्ट्रीय विमान नवी मुंबईत हलवणार नाही

मुख्यमंत्री फडणवीस यांचे केंद्राला पत्र

Google News Follow

मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानसेवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट विरोध दर्शवला आहे. मुंबई विमानतळावरून एकही आंतरराष्ट्रीय विमान नवी मुंबईत हलवू नये, अशी मागणी त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे पत्राद्वारे केली आहे. मुंबई आणि नवी मुंबई ही दोन्ही विमानतळे स्वतंत्रपणे आणि आपापल्या क्षमतेनुसार कार्यरत राहावीत, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे विमानसेवा स्थलांतराच्या प्रस्तावावरून सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे.

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-१ची इमारत जुनी झाल्याने तिचा पुनर्विकास करण्याचे नियोजन आहे. या कामासाठी मुंबई विमानतळाचे संचालन करणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने १४ आंतरराष्ट्रीय शहरांसाठीची विमानसेवा नवी मुंबई विमानतळावर हलवण्याचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये दोहा, दुबई, जेद्दाह, मस्कत, रियाध, काठमांडू, कुवेत आणि शारजा यांसारख्या शहरांचा समावेश आहे. एकूण आंतरराष्ट्रीय विमानसेवेपैकी सुमारे ३३ टक्के म्हणजेच आठवड्याला २६५ विमानसेवा स्थलांतरित करण्याची योजना होती. मात्र, विदेशी विमान कंपन्यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे.
हे ही वाचा:
मराठीत याला ढुंकूनही न बघणे म्हणतात…

नवी मुंबई देशातील सर्वात स्वच्छ शहर

पुण्याचे नाव फुलेनगर करा!

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टर्मिनल-१च्या पुनर्विकासासाठी पर्यायी आराखडा सुचवला आहे. त्यानुसार सर्वप्रथम मुंबई विमानतळावर नवीन टर्मिनल-१ बी उभारण्यात यावे. त्यानंतर सध्या टर्मिनल-१ ए मधून सुरू असलेले कामकाज नव्या टर्मिनलमध्ये हलवावे आणि त्यानंतर जुन्या इमारतीचा पुनर्विकास करावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. या टप्प्याटप्प्याच्या प्रक्रियेमुळे विमानतळाचे कामकाज सुरू ठेवता येईल आणि विमानसेवा दुसऱ्या विमानतळावर हलवण्याची गरज भासणार नाही.

दरम्यान, विमानसेवा स्थलांतरित केल्यास प्रवाशांना विमानतळ बदलण्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. विशेषतः जोडविमानसेवेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरील विद्यमान सुविधा कायम ठेवून पुनर्विकास करण्यावर मुख्यमंत्र्यांचा भर आहे. आता या पर्यायी प्रस्तावावर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालय काय निर्णय घेते, याकडे विमान कंपन्या आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा