30 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरक्राईमनामाकुलगाम हल्ल्यापूर्वीच सीआरपीएफ जवानांना मिळाला होता इशारा?

कुलगाम हल्ल्यापूर्वीच सीआरपीएफ जवानांना मिळाला होता इशारा?

धमकी देणाऱ्या मुलाचा शोध सुरू

Google News Follow

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हल्ल्याच्या दोन दिवस आधीच एका अल्पवयीन मुलाने सीआरपीएफच्या जवानांना धमकी दिली होती. ‘आम्ही तुम्हाला सोडणार नाही’, असे या मुलाने जवानांना म्हटले होते. सुरुवातीला जवानांनी या धमकीकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. मात्र, त्याच ठिकाणी दोन दिवसांनी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी या मुलाचा शोध सुरू केला आहे.

माहितीनुसार, सोमवारी (९ नोव्हेंबर) दहावीत शिकत असल्याचे मानले जाणाऱ्या एका मुलाने कुलगाममधील सीआरपीएफच्या स्थिर तपासणी नाक्यावर जाऊन जवानांना धमकी दिली होती. ‘हम तुम्हे छोडेंगे नहीं’ असे तो म्हणाला होता. बुधवारी (११ नोव्हेंबर) त्याच तपासणी नाक्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यामुळे या मुलाच्या धमकीचा आणि हल्ल्याचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्याची ओळख पटवून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गोळीबारात तीन सीआरपीएफ जवान जखमी

बुधवारी दुपारी सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास कुलगाम जिल्ह्यातील मीर बाजारजवळील अखरन परिसरात हा हल्ला झाला. दाट झाडीचा आडोसा घेत आलेल्या दोन सशस्त्र दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या नाक्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले असून, त्यापैकी एका जवानाची प्रकृती गंभीर आहे. जखमी जवानांना उपचारासाठी अनंतनाग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यावेळी जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि दहशतवाद्यांचा पाठलाग केला. मात्र, दहशतवादी झाडीचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.

हे ही वाचा:

लाभार्थी हिंदू, ताबा बांगलादेशींकडे? म्हाडाच्या ११० घरांवरून वाद

ईशान्य भारतातील कर्तृत्ववानांचा होणार गौरव

मूडीजकडून भारताच्या आर्थिक विकासदराचा अंदाज वाढवला

मॉर्निंग वॉकदरम्यान माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बेशुद्ध होऊन कोसळले

या हल्ल्यामागे प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. या प्रकरणात मोहम्मद लतीफ भट या स्थानिक दहशतवादी कमांडरच्या सहभागाचीही चौकशी केली जात आहे. हल्लेखोरांना स्थानिक पातळीवर मदत मिळाली होती का, याचाही तपास सुरू आहे. घटनास्थळावरून एक मोटोरोला मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा