34 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरस्पोर्ट्सरोहित-विराटचा नबीला कानमंत्र

रोहित-विराटचा नबीला कानमंत्र

Google News Follow

न्यूझीलंडच्या वेगवान आणि अनुकूल खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करताना केवळ स्विंगवर अवलंबून राहू नका, तर सीम मूव्हमेंटवर अधिक भर द्या, असा मोलाचा सल्ला भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी वेगवान गोलंदाज औकिब नबी याला दिला आहे. स्वतःच्या अनुभवातून मिळालेला हा सल्ला न्यूझीलंड दौऱ्यात आपल्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे नबीने स्पष्ट केले.

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना नबी म्हणाला, की न्यूझीलंडमध्ये गोलंदाजी करण्याचा हा त्याचा पहिलाच अनुभव आहे. येथील परिस्थिती भारतापेक्षा काहीशी वेगळी असली, तरी जम्मू-काश्मीरमधील वातावरण आणि खेळपट्ट्यांशी त्याचे साधर्म्य आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील फलंदाजांचा दर्जा वेगळा असल्याने गोलंदाजांना अधिक अचूकता राखावी लागते.

नबीच्या मते, उच्च दर्जाचे फलंदाज स्विंग होणाऱ्या चेंडूंचा सामना करण्यात तरबेज असतात. त्यामुळे चेंडू सीमवर टाकणे, खेळपट्टीवर योग्य टप्प्यावर आदळवणे आणि सीम मूव्हमेंटचा फायदा घेणे अधिक परिणामकारक ठरू शकते. गोलंदाजाने योग्य टप्प्यावर सातत्याने मारा केल्यास विकेट मिळवण्याच्या संधी वाढतात.

आपल्या यशाचे श्रेय त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभवाला दिले. वेग हा अतिरिक्त फायदा असला, तरी स्वतःच्या कौशल्यावर आणि अचूकतेवर त्याचा अधिक विश्वास आहे. खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी असो किंवा फलंदाजांसाठी अनुकूल, शिस्तबद्ध गोलंदाजी करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले.

विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्धची ही एकदिवसीय मालिका युवा खेळाडूंसाठी २०२७ च्या पुरुष एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने आपली क्षमता सिद्ध करण्याची मोठी संधी असल्याचे नबीने नमूद केले. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणे हे आपले स्वप्न होते आणि ही संधी मिळाल्याचा आनंद असल्याचेही त्याने सांगितले.

सुविधांचा अभाव असलेल्या भागांतील युवा क्रिकेटपटूंनाही नबीने प्रेरणादायी संदेश दिला. सुविधा कमी असल्या तरी मेहनतीला पर्याय नाही. सातत्याने कठोर परिश्रम करा, यशाचा मार्ग आपोआप खुला होईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा