31 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरविशेषचीनचा हवाई वाहतुकीत नवा अध्याय! इलेक्ट्रिक विमान झेपावले

चीनचा हवाई वाहतुकीत नवा अध्याय! इलेक्ट्रिक विमान झेपावले

‘सीई-२५ए’ची पायलटसह यशस्वी चाचणी

Google News Follow

इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या चीनने आता इलेक्ट्रिक विमान वाहतुकीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. चीनमध्ये विकसित करण्यात आलेल्या १९ आसनी ‘सीई-२५ए’ या पूर्णपणे बॅटरीवर चालणाऱ्या प्रवासी विमानाने पहिल्यांदाच पायलटसह यशस्वी चाचणी उड्डाण केले. शानडोंग प्रांतातील बिनझोऊ येथे १४ नोव्हेंबर रोजी ही चाचणी झाली. कमी अंतराच्या प्रादेशिक प्रवासी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक विमानांचा वापर करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

कॉमर्शियल एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन ऑफ चायना (कॉमॅक) या कंपनीने विकसित केलेल्या या विमानात दोन पायलट आणि एक उड्डाण चाचणी अभियंता होते. संपूर्ण चाचणीला ५७ मिनिटे ४६ सेकंद लागले. त्यापैकी विमानाने १६ मिनिटे ३८ सेकंद प्रत्यक्ष उड्डाण केले आणि ६०.४ किलोमीटर अंतर कापले. चाचणीदरम्यान विमानाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिल्याचे कंपनीने सांगितले.

एका उड्डाणात ४०० किमी अंतर

‘सीई-२५ए’मध्ये एकावेळी १९ प्रवासी प्रवास करू शकतात. विमानाचे कमाल उड्डाण वजन १० टन असून, ताशी कमाल वेग ३०० किलोमीटर आहे. सुमारे २,४०० मीटर उंचीवर उड्डाण करण्याची आणि एका उड्डाणात सुमारे ४०० किलोमीटर अंतर कापण्याची त्याची क्षमता आहे. विमानात पारंपरिक इंजिनांऐवजी बॅटरीवर चालणारे दहा इलेक्ट्रिक डक्टेड फॅन्स बसवण्यात आले आहेत. प्रत्येक पंखावर पाच फॅन्स आहेत. कॉमॅकने चीनची बॅटरी उत्पादक कंपनी सीएटीएल, शांघाय जिआओ टोंग विद्यापीठ आणि अन्य भागीदारांच्या सहकार्याने हे विमान विकसित केले आहे.

हे ही वाचा:

श्रीगंगानगर स्फोटप्रकरणी आणखी दोन बॉम्ब जप्त

कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संपर्क नव्हता, तेव्हा अजितदादांचा फोन यायचा

घरबसल्या नोकरीच्या आमिषाने तरुणीला ९०.८ लाखांचा गंडा

आसियान, पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी मनिलात दाखल

व्यावसायिक वापरासाठी मंजुरी बाकी

या विमानाने २ फेब्रुवारी २०२६ रोजी पहिली मानवरहित स्वयंचलित चाचणी घेतली होती. त्यानंतर १९ मानवरहित चाचणी उड्डाणे पूर्ण झाली. आता पायलटसह चाचणीही यशस्वी झाली आहे. मात्र, नियमित प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी चीनच्या नागरी विमान वाहतूक प्रशासनाचे (सीएएसी) प्रमाणपत्र आवश्यक आहे. कंपनीचा अर्ज स्वीकारण्यात आला असला, तरी अंतिम मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे व्यावसायिक सेवेत दाखल होण्यापूर्वी आणखी चाचण्या आणि सुरक्षा तपासण्या पूर्ण कराव्या लागणार आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा