33 C
Mumbai
Tuesday, November 17, 2026
घरविशेषसोनू सूदने अभिनेता शरद कपूरला दिला मदतीचा हात

सोनू सूदने अभिनेता शरद कपूरला दिला मदतीचा हात

Google News Follow

अभिनेता सोनू सूद याने नुकतीच प्रकृतीच्या कारणास्तव संघर्ष करत असलेला चित्रपट अभिनेता शरद कपूरची भेट घेतली. शरद कपूर सध्या आरोग्यविषयक समस्यांशी झुंज देत आहे. अलीकडेच त्याच्या प्रकृती व आर्थिक अडचणींमुळे त्याने आपले कुत्रे एका निवारा केंद्रात सोडल्याचे वृत्त समोर आल्यानंतर ते चर्चेत आले होते. त्याचे काही व्हीडिओ समोर आले ज्यात त्याच्या एकूणच आरोग्याच्या परिस्थितीवरून तो मोठ्या संकटात असल्याचे दिसते आहे.

सोनू सूदने केवळ शरद कपूरची भेट घेतली नाही, तर त्याच्या आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी वैद्यकीय मदत देण्याचीही तयारी दर्शवली. या भेटीदरम्यान सोनू सूदने शरद कपूर याच्याशी त्याच्या आरोग्यविषयक आणि आर्थिक अडचणींबाबत चर्चा केली आणि त्याला वैद्यकीय मदतीचे आश्वासन दिले. शरद कपूरने पुष्टी केली की, चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्याच्याशी संपर्क साधला होता. चित्रपटसृष्टीकडे मदतीचे आवाहन करणारे निवेदन प्रसिद्ध केल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधणाऱ्यांमध्ये सोनू सूद यांचाही समावेश होता.

जोश चित्रपटातील अभिनेता शरद कपूरने गेल्या आठवड्यात एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्याने ज्येष्ठ कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील सदस्यांना, विशेषतः सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) ला, काम मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, शरद कपूरने एक निवेदन जारी केले होते. त्यापूर्वी समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये तो अशक्त दिसत होता आणि त्याचे कुत्रे एका निवारा केंद्रात नेले जात असल्याचे दिसत होते. त्याने स्पष्ट केले की, तो जनतेकडून पैशांची मदत मागत नव्हता. आपल्या चार कुत्र्यांची तात्पुरती देखभाल करण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याने केवळ आपल्या जुनी मैत्रीण हेमा चौधरी यांच्याशी संपर्क साधला होता.

हे ही वाचा:

‘आम आदमी’चा शिशमहल आता आम जनतेसाठी खुला

भारत-आसियान देशांचे संबंध स्थैर्यासाठी महत्त्वाचे

दहशतवादविरोधी कारवायांसाठी ‘फोर्स वन’ एटीएसच्या नियंत्रणाखाली

अंडर-१९ आशिया चषकातील हिरो मोहित उल्वा खेळणार सौराष्ट्रकडून

त्याने सांगितले, “लोक म्हणत आहेत की मला मदतीची गरज आहे. मला वाटते, असे सांगितल्याशिवाय तुम्हाला व्ह्यूज मिळत नाहीत. समस्या ही आहे की मला घर साफ करण्यासाठी कोणीही मिळत नाही. हीच एकमेव अडचण आहे. माझ्या कुत्र्यांसाठी मदत करण्यासाठी मी हेमाशी संपर्क साधला. ती एक अतिशय चांगली महिला आहे. ती आली आणि माझ्या कुत्र्यांना तिच्या निवारा केंद्रात घेऊन गेली. काही दिवसांत ते पुन्हा माझ्याकडे परत येतील.”

तो पुढे म्हणाला की, “आता मी हे घर विकून दुसरीकडे राहायला जाण्याचा विचार करत आहे, त्यामुळे सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. आर्थिकदृष्ट्या मी ठीक आहे. मला फक्त चांगले काम हवे आहे, एवढेच. काम मागण्यात मला कोणतीही लाज वाटत नाही. सध्या मला काम मिळवण्यात थोडी अडचण येत आहे, त्यामुळे लोकांनी मला पाठिंबा द्यावा, अशी आशा आहे. चित्रपटसृष्टीने नेहमीच मला पाठिंबा दिला आहे आणि या क्षेत्रातील लोकांवर माझे प्रेम आहे. अनेकांनी मला मदतीची गरज आहे का, असे विचारण्यासाठी संपर्क साधला आहे; पण मी फक्त काम मागितले आहे.”

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा