33 C
Mumbai
Wednesday, November 18, 2026
घरस्पोर्ट्स'सँडपेपरगेट' प्रकरणातले अनुभव ऐकण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा फोरम

‘सँडपेपरगेट’ प्रकरणातले अनुभव ऐकण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा फोरम

खेळाडू आणि कर्मचाऱ्यांचे अनुभव गोपनीय ठेवले जाणार

Google News Follow

ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाने लिहिलेल्या आत्मचरित्रात २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सँडपेपरगेट प्रकरणी लिहिले आहे. त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ माजली आहे. यासाठी आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाऊल उचलले असून २०१८च्या दौऱ्यात गेलेल्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी एक स्वतंत्र फोरम स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून त्यांना त्या काळातील आपले अनुभव आणि बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. मात्र, केपटाऊनमधील घटनेची नव्याने चौकशी केली जाणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याचे आत्मचरित्र ‘सब्र’ प्रकाशित झाल्यानंतर २०१८ मधील केपटाऊन कसोटी सामन्यात घडलेले सँडपेपरगेट प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. ख्वाजा याने दावा केला आहे की, या घटनेची माहिती संपूर्ण संघाला होती. तसेच, पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या मागील कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघाने अशाच प्रकारची कृती केली होती, असेही त्यांनी म्हटले आहे.

माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यानेही ख्वाजाच्या दाव्यांचे समर्थन केले आहे. या प्रकरणात वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांना दोषी ठरवण्यात आले होते आणि त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली होती.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष डेव्हिड बून म्हणाले, “सखोल विचारविनिमयानंतर सीएच्या संचालक मंडळाने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेत घडलेल्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे अनुभव आणि दृष्टिकोन मांडण्याची संधी देणारा एक फोरम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.”

हे ही वाचा:

जेन्सेन हुआंगच्या एनव्हिडियात परतण्याच्या अपेक्षांवर पाणी

पळून गेलेला जखमी दहशतवादी लतीफ भट अखेर ठार

ट्रॅव्हिस हेडची आयपीएल २०२७ मधून माघार

आझम खान यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा

ते पुढे म्हणाले, “हे क्रिकेट खेळाच्या सर्वोत्तम हिताचे असल्याचा आमचा विश्वास आहे. जवळपास दशकभरापासून त्या घटनांचे परिणाम ऑस्ट्रेलियन क्रिकेटविषयीच्या चर्चेचा भाग राहिले आहेत. अनेकांसाठी हा अत्यंत कठीण काळ राहिला आहे आणि आता ही सतत सुरू असलेली चर्चा खेळापासून लक्ष विचलित करू लागली आहे. त्यामुळे आता या चर्चेला विराम देण्याची वेळ आली आहे, असे आम्हाला वाटते.

हा फोरम भूतकाळातील घटनांवर पुन्हा चर्चा करण्यासाठी नाही. तर ज्यांना सन्मानपूर्वक वातावरणात आपली कहाणी सांगायची आहे, अशा लोकांना संधी देण्यासाठी आणि त्यांच्या भावना ऐकून घेण्यासाठी हा प्रयत्न आहे.”

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टॉड ग्रीनबर्ग म्हणाले, “गेल्या आठवड्यात 2018 मधील केपटाऊन कसोटी सामन्यात नेमके काय घडले होते, याबाबत आम्ही अनेक वेगवेगळे दृष्टिकोन ऐकले आहेत. हा खेळ आणि त्याच्याशी संबंधित सर्वांसाठी अत्यंत कठीण आणि अस्वस्थ करणारा काळ राहिला आहे.

त्यावेळी जे घडले आणि आजही त्याबाबत जी चर्चा सुरू आहे, त्याचा त्या काळातील क्रिकेट संस्कृतीशी मोठा संबंध आहे. ही संस्कृती निर्माण करण्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचाही सहभाग होता. एथिक्स सेंटरच्या अहवालानंतर आणि त्यातील 42 पैकी 36 शिफारशी स्वीकारल्यानंतर या बाबीची दखल घेण्यात आली होती.

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा