33 C
Mumbai
Wednesday, November 18, 2026
घरराजकारणराहुल गांधी जगाला ओरडून सांगतायत, मी मूर्ख आहे

राहुल गांधी जगाला ओरडून सांगतायत, मी मूर्ख आहे

अतुल भातखळकरांचा घणाघात

Google News Follow

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अनेकदा परदेशात जाऊन भारतीय अर्थव्यवस्थेबाबत, लोकशाहीबाबत टीकात्मक विधाने करत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील कार्यक्रमातही राहुल गांधी यांनी भारताची अर्थव्यवस्था ‘आर्थिक आपत्ती’च्या उंबरठ्यावर असल्याचे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे.

आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारताच्या अर्थकारणाबाबत नकारात्मक विधाने करून राहुल गांधी जगाला ओरडून ओरडून सांगत आहेत की, मी मूर्ख आहे, मी मंद आहे, माझा मेंदू दिव्यांग आहे,” अशा कठोर शब्दांत अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतासमोर बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेच्या मोठ्या समस्या असून, देशाचे आर्थिक मॉडेल अपेक्षित परिणाम देण्यात अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ या योजनांमधून पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नसल्याची टीकाही त्यांनी केली.

हे ही वाचा:

जावेद अख्तर म्हणतात, प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम

राहुल गांधी अमेरिकेत पुन्हा बरळले

मुंबई विमानतळावर स्पाईसजेटचे शेकडो प्रवासी अडकले

जागतिक नेत्यांना मोदींकडून भारतीय कलांचा नजराणा

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेले लघु आणि मध्यम उद्योग तसेच कृषी क्षेत्र अडचणीत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. देशात खासगी गुंतवणूक का होत नाही आणि अदानी-अंबानी यांसारख्या मोजक्या उद्योगसमूहांचाच विस्तार का होत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या विधानांवर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा