30 C
Mumbai
Wednesday, November 18, 2026
घरविशेषमहाराष्ट्रातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेला मुदतवाढ

महाराष्ट्रातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेला मुदतवाढ

३० नोव्हेंबरपर्यंत संधी

Google News Follow

महाराष्ट्रातील मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. या मोहिमेंतर्गत मतदारांची माहिती तपासणे, दुबार नावे शोधणे, मृत मतदारांची नावे वगळणे आणि पात्र नव्या मतदारांची नोंदणी करणे यावर भर दिला जात आहे. नागरिकांना आपली माहिती तपासून आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अधिक वेळ मिळावा, या उद्देशाने मोहिमेचे वेळापत्रक सुधारण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने दिलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, १८ नोव्हेंबरपर्यंत गणना अर्जांची निर्मिती आणि छपाई पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर १८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदारांना गणना अर्जांचे वितरण आणि संकलन केले जाईल. प्राप्त अर्जांवरील कार्यवाही १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाचे अवर सचिव संदीप कुमार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्रासह दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश, नागालँड, हरियाणा आणि झारखंड या राज्यांसाठी सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
अंतिम चेंडूवर मोहितने मारलेला चौकार कायम लक्षात राहील!

राहुल गांधी कोणाच्या मांडीवर बसले आहेत?

टोरेस घोटाळ्याचा मुख्य आरोपी ईडीच्या ताब्यात!

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज!

महाराष्ट्रात एसआयआर प्रक्रियेतील नोटीस बजावणे, दावे आणि हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. या काळात मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशिलांबाबत नागरिकांना दावे आणि हरकती नोंदवता येणार आहेत. त्यानंतर २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी आपल्या नावाची आणि वैयक्तिक तपशिलांची पडताळणी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, सुधारित वेळापत्रकाची माहिती सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय पक्षांना लेखी स्वरूपात देण्याचे निर्देशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच या मोहिमेची व्यापक प्रसिद्धी करण्यास सांगण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा