30 C
Mumbai
Wednesday, November 18, 2026
घरक्राईमनामाशाळेत भगवी साडी नेसल्याने शिक्षिकेला विचारला जाब

शाळेत भगवी साडी नेसल्याने शिक्षिकेला विचारला जाब

शुभेंदू सरकारकडून चौकशीचे आदेश

Google News Follow

पश्चिम बंगालमधील एका ख्रिश्चन मिशनरी शाळेत भगवी साडी नेसून आलेल्या महिला शिक्षिकेला सहकाऱ्याने जाब विचारल्याचा प्रकार समोर आला आहे. या कथित घटनेमुळे राज्यात राजकीय वाद निर्माण झाला असून, मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आरोप सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल, तसेच शाळेचा ना हरकत दाखला (एनओसी) रद्द केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात हा आरोप केला होता. त्यांच्या दाव्यानुसार, कोलकात्यातील एका प्रतिष्ठित ख्रिश्चन मिशनरी शाळेत कार्यरत असलेल्या महिला शिक्षिकेला सार्वजनिक ठिकाणी भगव्या रंगाच्या साड्या नेसण्याबाबत तिच्या सहकाऱ्याने प्रश्न विचारले. तसेच, शाळेच्या परिसरात भगवी साडी नेसणे मान्य नसल्याचे तिला सांगण्यात आल्याचा आरोपही भट्टाचार्य यांनी केला होता.

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी माहितीची पडताळणी केली जाईल, असे सांगितले. संबंधित व्यक्तीविरोधात लेखी तक्रार दाखल झाली आणि आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाले, तर कारवाई करण्यात येईल. तसेच, या प्रकारात शाळा व्यवस्थापनाचा सहभाग आढळल्यास संस्थेचा एनओसी रद्द केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

ब्रह्मोसनंतर आता आकाश, पिनाकाच्या खरेदीत फिलिपाइन्सला स्वारस्य

सावरकरांच्या केलेल्या अपमानावरून शिवसेनेने सोनियांचे पुस्तक फाडले

राहुल गांधी हे मेंदू दिव्यांग

जावेद अख्तर म्हणतात, प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम

राज्याचे शिक्षणमंत्री दीपक बर्मन यांनीही या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार आरोपांची पडताळणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यातील कालिम्पोंग, आसनसोल आणि पूर्व बर्धमान या भागांत धर्मांतराच्या घटना वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, पश्चिम बंगाल असोसिएशन ऑफ ख्रिश्चन स्कूलच्या प्रतिनिधींनी मिशनरी शाळांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कपड्यांच्या रंगावर कोणतेही बंधन नसल्याचे म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा