31 C
Mumbai
Thursday, November 19, 2026
घरबिजनेसचार चाकी वाहन विक्रीत महाराष्ट्र देशात अव्वल

चार चाकी वाहन विक्रीत महाराष्ट्र देशात अव्वल

उत्तर प्रदेश दुचाकी विक्रीत अव्वल

Google News Follow

देशातील वाहन विक्रीच्या बाजारपेठेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे. जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीत प्रवासी वाहने आणि वाणिज्य वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. वाहन उत्पादक कंपन्यांची संघटना ‘सियाम’ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. या तिमाहीत देशभरात १३.६१ लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक १.६५ लाख वाहनांची विक्री झाली. देशातील एकूण प्रवासी वाहन विक्रीत महाराष्ट्राचा वाटा १२.१ टक्के आहे. या यादीत उत्तर प्रदेश, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक ही राज्ये महाराष्ट्राच्या पाठोपाठ आहेत.

वाणिज्य वाहनांच्या विक्रीतही महाराष्ट्राने आपली आघाडी कायम ठेवली आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत देशभरात ३.०९ लाख वाणिज्य वाहनांची विक्री झाली. यापैकी महाराष्ट्रात ४६ हजार वाहनांची विक्री झाली. देशातील एकूण विक्रीत महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के आहे. मालवाहतूक, बांधकाम व्यवसाय आणि औद्योगिक क्षेत्रासाठी वाहनांची मोठी गरज असल्याने राज्यात या वाहनांना चांगली मागणी असल्याचे दिसून येते. या प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ही राज्ये पुढे आहेत.

हे ही वाचा:
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज!

महाराष्ट्राच्या धरणांमधील पाणीसाठा ६४ टक्क्यांवर!

काश्मीरमधील शेवटचा ज्ञात स्थानिक लश्कर दहशतवादी ठार

अमेरिकेतून हद्दपार होताच खलिस्तान समर्थकाला अटक

दुसरीकडे, दुचाकी वाहनांच्या विक्रीत उत्तर प्रदेशने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. या तिमाहीत देशभरात ६४.३३ लाख दुचाकींची विक्री झाली. त्यापैकी उत्तर प्रदेशात ७.८९ लाख दुचाकी विकल्या गेल्या. एकूण विक्रीत या राज्याचा वाटा १२.३ टक्के आहे. महाराष्ट्र या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो. तीनचाकी वाहनांच्या विक्रीतही उत्तर प्रदेशने आघाडी घेतली असून, राज्यात ३४ हजार वाहनांची विक्री झाली आहे.

एकूणच, वाहनांच्या विविध प्रकारांनुसार देशातील बाजारपेठेचे चित्र वेगवेगळे असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. प्रवासी आणि वाणिज्य वाहनांच्या खरेदीसाठी महाराष्ट्र ही देशातील सर्वांत मोठी बाजारपेठ ठरली आहे, तर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीत उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पश्चिम विभागातही प्रवासी, दुचाकी आणि वाणिज्य वाहनांची सर्वाधिक विक्री झाली आहे. त्यामुळे देशाच्या वाहन उद्योगातील वाढीसाठी महाराष्ट्राची बाजारपेठ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा