30 C
Mumbai
Thursday, November 19, 2026
घरबिजनेसगोकुळच्या दुधात प्रतिलिटर ६ रुपयांची दरवाढ

गोकुळच्या दुधात प्रतिलिटर ६ रुपयांची दरवाढ

शेतकऱ्यांनाही ३ रुपये जादा

Google News Follow

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने दूध दरवाढीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गोकुळच्या म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर ६ रुपयांची वाढ करण्यात आली असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच गायीच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २१ नोव्हेंबरपासून हे नवे दर लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार असला, तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे.

गोकुळ दूध संघाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दूध संघासमोर सुमारे ७० कोटी रुपयांची तूट भरून काढण्याचे आव्हान आहे. वाढता उत्पादन खर्च, पशुखाद्याचे दर आणि दूध संकलनावरील खर्च लक्षात घेता दरवाढ आवश्यक असल्याची भूमिका संघाकडून मांडण्यात आली. विशेष म्हणजे, गोकुळच्या इतिहासातील ही मोठी दरवाढ असल्याची चर्चा आहे. जानेवारी महिन्यात दुधाची उपलब्धता आणि बाजारातील मागणीचा आढावा घेऊन पुन्हा दरवाढ करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:
अग्निवीरवायूंना आता योगाचे धडे!

अमित देशमुखांकडून टिपू सुलतानचा उदो उदो!

२०७० पर्यंत भारत हिंदूबहुलच; मुस्लिम लोकसंख्येचा वाटा वाढणार

सुरुवातीच्या धक्क्यांतून सावरत न्यूझीलंडची दमदार मुसंडी!

दरम्यान, दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून गोकुळच्या संचालक मंडळात मतभेद असल्याचेही समोर आले होते. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीच्या संचालकांनी दूध विक्री दरवाढीबरोबरच उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरातही वाढ करण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत असताना त्यांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. अखेर म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर ३ रुपये आणि गायीच्या दुधासाठी २ रुपये खरेदी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

गोकुळमधील सत्तांतरानंतर अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्याच संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या होत्या, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या होत्या. मात्र, चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीनंतर सत्तेचे गणित बदलले आणि शिवाजी पाटील अध्यक्षपदी विराजमान झाले. आता नव्या नेतृत्वाच्या काळातील पहिल्याच मोठ्या निर्णयामुळे गोकुळच्या कारभारासह दूध दरवाढीची चर्चा रंगली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा