30 C
Mumbai
Thursday, November 19, 2026
घरराजकारणमहुआ मोइत्रा यांच्या ताफ्यावर पुन्हा अंडीफेक

महुआ मोइत्रा यांच्या ताफ्यावर पुन्हा अंडीफेक

काळे झेंडे दाखवत ‘गो बॅक’च्या घोषणा

Google News Follow

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी भारतीय जनता पक्ष यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या वाहनांच्या ताफ्यावर भाजप कार्यकर्त्यांनी अंडी फेकल्याची घटना गुरुवारी (१९ नोव्हेंबर) घडली. महुआ मोइत्रा या कृष्णनगरहून कालीगंजकडे जात असताना नदिया जिल्ह्यातील गोबरा पंचायत परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला घेराव घातला. आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर अंडी फेकली आणि वाहनाला धक्काबुक्की केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेदरम्यान आंदोलकांनी महुआ मोइत्रा यांच्या विरोधात ‘गो बॅक’च्या घोषणा दिल्या. काही कार्यकर्त्यांच्या हातात भाजपचे झेंडे, काठ्या आणि झाडू असल्याचेही समोर आले आहे. आंदोलकांनी वाहनाला घेरल्यामुळे मोइत्रा यांना काही काळ गाडीतच थांबावे लागले. या संपूर्ण घटनेचे त्यांनी आपल्या मोबाईलवरून थेट प्रक्षेपण केले. संभाव्य आंदोलनाची माहिती पोलिसांना आधीच देण्यात आली होती, तरीही पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याऐवजी आपल्यालाच तेथून निघून जाण्यास सांगितल्याचा दावाही त्यांनी केला.

हे ही वाचा:
अग्निवीरवायूंना आता योगाचे धडे!

अमित देशमुखांकडून टिपू सुलतानचा उदो उदो!

२०७० पर्यंत भारत हिंदूबहुलच; मुस्लिम लोकसंख्येचा वाटा वाढणार

सुरुवातीच्या धक्क्यांतून सावरत न्यूझीलंडची दमदार मुसंडी!

घटनेनंतर महुआ मोइत्रा यांनी पश्चिम बंगाल पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्या सुरक्षेसंदर्भात कलकत्ता उच्च न्यायालयाने आदेश दिलेले असतानाही पोलिसांकडून योग्य संरक्षण मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे लक्ष वेधले आहे. दुसरीकडे, भाजपने या आंदोलनाचे समर्थन केले आहे. महुआ मोइत्रा यांनी हिंदू देवी-देवतांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे जनतेमध्ये नाराजी असल्याचा दावा भाजपचे नदिया जिल्हा माध्यम संयोजक संदिपान मजुमदार यांनी केला.

दरम्यान, महुआ मोइत्रा यांच्या सुरक्षेचा प्रश्न यापूर्वीही न्यायालयात पोहोचला आहे. १६ सप्टेंबर रोजी तेहट्टा येथेही त्यांच्या वाहनावर अंडी फेकण्यात आल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांच्या मतदारसंघातील दौऱ्यांदरम्यान दोन पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. हा आदेश ३० नोव्हेंबरपर्यंत लागू आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे ताज्या घटनेनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा