27 C
Mumbai
Friday, November 20, 2026
घरबिजनेससोने-चांदीनंतर आता तांब्याचे दरही कोसळले

सोने-चांदीनंतर आता तांब्याचे दरही कोसळले

एसी आणि फ्रिज स्वस्त होणार?

Google News Follow

सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीनंतर आता औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाचा धातू असलेल्या तांब्याच्या किमतींनाही मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तांब्याचे दर सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. गेल्या महिनाभरात भारतात तांब्याच्या किमती सुमारे १५ टक्क्यांनी, तर आंतरराष्ट्रीय बाजारात १३ टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत. १९ नोव्हेंबर रोजी लंडन मेटल एक्सचेंजवर तांब्याचे तीन महिन्यांचे वायदे एका दिवसात ४.६ टक्क्यांनी घसरून १२,४७१ डॉलर प्रति टनांवर आले. तर भारतातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर तांब्याचा भाव १.६० टक्क्यांनी घसरून १,१९२ रुपये प्रति किलोवर बंद झाला. या घसरणीमुळे आता एसी आणि फ्रिजसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तांब्याच्या किमती घसरण्यामागे जागतिक बाजारातील अनेक कारणे आहेत. चीन हा जगातील तांब्याचा मोठा ग्राहक असून तेथील औद्योगिक क्षेत्र आणि रिअल इस्टेट व्यवसायातील मंदीमुळे तांब्याची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने धातूंच्या बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांबाबत कठोर भूमिका घेतली जाण्याची शक्यताही या घसरणीला कारणीभूत ठरत आहे. याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सेंटर आणि वीज पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीमुळे तांब्याची मागणी वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या क्षेत्रातील गुंतवणुकीच्या वेगाबाबत निर्माण झालेल्या चिंतेमुळे तांब्याच्या किमतींवर दबाव वाढला आहे.

हे ही वाचा:
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज!

महाराष्ट्राच्या धरणांमधील पाणीसाठा ६४ टक्क्यांवर!

काश्मीरमधील शेवटचा ज्ञात स्थानिक लश्कर दहशतवादी ठार

अमेरिकेतून हद्दपार होताच खलिस्तान समर्थकाला अटक

तांब्याचा वापर केवळ औद्योगिक उत्पादनातच नाही, तर दैनंदिन वापरातील अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. एसीमधील कॉम्प्रेसर, मोटर, वायरिंग आणि कॉइल, तर फ्रिजमधील कॉम्प्रेसर, मोटर आणि इलेक्ट्रिकल सर्किट तयार करण्यासाठी तांबे आवश्यक असते. वॉशिंग मशीनमध्येही त्याचा वापर केला जातो. एसबीआय सिक्युरिटीजच्या अंदाजानुसार, एसी आणि एचव्हीएसीशी संबंधित उत्पादनांच्या एकूण उत्पादन खर्चात तांब्याचा वाटा सुमारे १० ते २५ टक्के असतो. त्यामुळे तांबे स्वस्त झाल्यास कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन नफ्याचे प्रमाण वाढू शकते. याच अपेक्षेने १९ नोव्हेंबर रोजी व्होल्टासच्या शेअर्समध्ये ९ टक्के, ब्लू स्टारमध्ये ८.९४ टक्के, अंबर एंटरप्रायझेसमध्ये ७.६१ टक्के, तर पीजी इलेक्ट्रोप्लास्टच्या शेअर्समध्ये ७.०३ टक्क्यांची वाढ झाली.

मात्र, तांब्याचे दर घसरले म्हणजे एसी आणि फ्रिज लगेच स्वस्त होतील, असे नाही. कंपन्यांकडे आधीच महागड्या दराने खरेदी केलेल्या कच्च्या मालाचा साठा असू शकतो. तसेच स्टील, अॅल्युमिनियम, प्लास्टिक आणि इतर सुट्या भागांच्या किमतींचाही उत्पादन खर्चावर परिणाम होतो. विशेष म्हणजे २०२६ मध्ये विविध कंपन्यांनी एसी आणि फ्रिजच्या किमतीत तीन ते चार वेळा वाढ केली असून काही उत्पादनांच्या किमती १० ते १५ टक्क्यांपर्यंत महागल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा