31 C
Mumbai
Saturday, November 21, 2026
घरक्राईमनामानेव्हल डॉकयार्डची छायाचित्रे, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी अप्रेंटिसला अटक

नेव्हल डॉकयार्डची छायाचित्रे, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी अप्रेंटिसला अटक

पाकिस्तानी हँडलर्सशी संपर्क असल्याचा सुरक्षा यंत्रणांना संशय

Google News Follow

मुंबईतील भारतीय नौदलाच्या नेव्हल डॉकयार्डच्या सुरक्षेत संभाव्य सेंध लागल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. डॉकयार्ड आणि नौदलाच्या संवेदनशील ठिकाणांची छायाचित्रे व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी कोलाबा पोलिसांनी एका अप्रेंटिस तरुणाला अटक केली आहे. बंटी रामप्रकाश मीना असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, तो मूळचा राजस्थानमधील करौली जिल्ह्याचा रहिवासी आहे. या संशयास्पद ऑनलाइन हालचालींचे धागेदोरे पाकिस्तानमध्ये बसलेल्या हँडलर्सशी जोडलेले असण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया डिजिटल लॅबला इन्स्टाग्रामवरील एका खात्याच्या संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्या होत्या. या खात्यावरून नेव्हल डॉकयार्ड तसेच भारतीय नौदलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांची छायाचित्रे आणि व्हिडीओ प्रसारित केले जात असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर डिजिटल फुटप्रिंट आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित इन्स्टाग्राम खाते चालवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. त्यातून बंटी मीना याची ओळख पटली. तो नेव्हल डॉकयार्डमध्ये अप्रेंटिस म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

नौदलाच्या संवेदनशील ठिकाणांची माहिती सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा प्रकार केवळ निष्काळजीपणातून घडला की त्यामागे एखादे सुनियोजित कारस्थान आहे, याचा तपास केला जात आहे. संबंधित इन्स्टाग्राम खात्याचा पाकिस्तानमधील हँडलर्सशी संपर्क होता का, याचाही तपास यंत्रणा करत आहेत.

हे ही वाचा:

काल ‘मृत’ अर्थव्यवस्था, आज भारत अमेरिकेसाठी आदर्श!

मणिपूरमध्ये विषारी दारूने घेतला १५ जणांचा बळी

भारतात जन्मलेल्या दहशतवाद्यांपासून जम्मू-काश्मीर ३५ वर्षांनी मुक्त!

अय्यप्पा दीक्षा घेतलेल्या हिंदू कर्मचाऱ्याला टीसीएस कार्यालयात प्रवेश नाकारला

या प्रकरणी कोलाबा पोलीस ठाण्यात ऑफिशियल सीक्रेट्स ऍक्ट, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, आरोपीच्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍप खात्यांची, त्यावरील संभाषणांची तसेच डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे. त्याचा मोबाईल, सिमकार्ड आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील माहिती तपासली जात आहे. या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, तसेच संबंधित छायाचित्रे आणि व्हिडीओ कोणाच्या सांगण्यावरून अपलोड करण्यात आले, याचा शोध पोलीस घेत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा