31 C
Mumbai
Saturday, November 21, 2026
घरक्राईमनामाघाटकोपरमध्ये सात बांगलादेशी घुसखोरांना अटक

घाटकोपरमध्ये सात बांगलादेशी घुसखोरांना अटक

१० महिन्यांपासून होते बेकायदेशीर वास्तव्य

Google News Follow

भारतात गेल्या दहा महिन्यांपासून बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या सात बांगलादेशी नागरिकांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. घाटकोपर (पश्चिम) येथील जागृती नगर परिसरात गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, या सर्वांना मायदेशी हद्दपार (डिपोर्ट) करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

घाटकोपर पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाला (एटीसी) काही संशयित व्यक्ती परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, शुक्रवारी (दि. २०) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील आणि त्यांच्या पथकाने जागृती नगरमधील संत तुकाराम ब्रिज, दिशा हॉस्पिटलसमोर सापळा रचून गस्त घातली. यावेळी सात जण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्यांच्याकडे बांगलादेशी जन्मदाखला, नॅशनल आयडी आणि मोबाईलमध्ये बांगलादेशी क्रमांक आढळून आले. अधिक चौकशीत त्यांनी कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय किंवा परवानगीशिवाय अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली.

मोहमंद बदरूजमान नजरूल इस्लाम मोडल (३५), सोहाग अब्दुल हन्नान राणा (३०), मोनीर कालु फकीर (३०), बिपलोभ मोहमंद जहांगीर बाबलु होसेन (२०), नईम मिझानुर रहमान शेख (२२), साजीद मोहमंद शाहजान हावलालदार (३७) आणि राकीब मोहमंद आबु नासेर होसेन (२२) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण मूळचे बांगलादेशचे रहिवासी असून सध्या डोंबिवली (पश्चिम) येथील गरीबाचा वाडा परिसरात राहत होते.

हे ही वाचा:

नेव्हल डॉकयार्डची छायाचित्रे, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी अप्रेंटिसला अटक

काल ‘मृत’ अर्थव्यवस्था, आज भारत अमेरिकेसाठी आदर्श!

मणिपूरमध्ये विषारी दारूने घेतला १५ जणांचा बळी

भारतात जन्मलेल्या दहशतवाद्यांपासून जम्मू-काश्मीर ३५ वर्षांनी मुक्त!

या सातही जणांना भारतातून हद्दपार करण्यासाठी परकीय नागरिक नोंदणी अधिकारी तथा गुन्हे अन्वेषण विभागाचे (विशा-१) पोलीस उपायुक्त यांच्याकडे अहवाल सादर करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल आर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश पाटील, पोलीस हवालदार काटे आणि शिपाई सातपुते यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा