31 C
Mumbai
Saturday, November 21, 2026
घरक्राईमनामापन्नू हत्या कटप्रकरणी निखिल गुप्ताला १९ वर्षांचा तुरुंगवास

पन्नू हत्या कटप्रकरणी निखिल गुप्ताला १९ वर्षांचा तुरुंगवास

हत्येसाठी सुपारी देण्याचा प्रयत्न केल्याची कबुली

Google News Follow

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला अमेरिकेतील न्यायालयाने १९ वर्षे ७ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील दक्षिण जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश व्हिक्टर मॅरेरो यांनी शुक्रवारी (२० नोव्हेंबर) हा निर्णय दिला. गुप्ता याला २३५ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमेरिकेच्या भूमीवर एका नागरिकाच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

निखिल गुप्ता (५५) याने फेब्रुवारी २०२६ मध्ये हत्येसाठी सुपारी देणे, हत्येचा कट रचणे आणि मनी लॉन्ड्रिंगच्या कटात सहभागी असणे, या तीन आरोपांबाबत न्यायालयात दोषी असल्याची कबुली दिली होती. २०२३ मध्ये न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या पन्नूची हत्या करण्यासाठी मारेकरी शोधण्याची जबाबदारी त्याच्यावर होती, असा अमेरिकी तपास यंत्रणांचा आरोप आहे.

हे ही वाचा:

नेव्हल डॉकयार्डची छायाचित्रे, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याप्रकरणी अप्रेंटिसला अटक

काल ‘मृत’ अर्थव्यवस्था, आज भारत अमेरिकेसाठी आदर्श!

मणिपूरमध्ये विषारी दारूने घेतला १५ जणांचा बळी

भारतात जन्मलेल्या दहशतवाद्यांपासून जम्मू-काश्मीर ३५ वर्षांनी मुक्त!

अमेरिकेच्या न्याय विभागाच्या माहितीनुसार, मे २०२३ मध्ये भारतीय सरकारी कर्मचारी विकास यादव याने निखिल गुप्ताला पन्नूच्या हत्येचा कट रचण्यासाठी संपर्क साधला होता. गुप्ताने एका व्यक्तीशी संपर्क साधला. मात्र, तो प्रत्यक्षात अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट ऍडमिनिस्ट्रेशनचा (DEA) गुप्त माहितीदार होता. त्याने गुप्ताची ओळख एका मारेकऱ्याशी करून दिली. हा मारेकरीदेखील प्रत्यक्षात DEA चा गुप्त अधिकारी होता. पन्नूच्या हत्येसाठी एक लाख डॉलर देण्याचे ठरले होते. त्यापैकी १५ हजार डॉलर आगाऊ रक्कम म्हणून देण्यात आले होते. तपास यंत्रणांनी या व्यवहारांवर लक्ष ठेवून कट उधळून लावला. त्यानंतर ३० जून २०२३ रोजी झेक प्रजासत्ताकातील प्राग येथे गुप्ताला अटक करण्यात आली. जून २०२४ मध्ये त्याचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा