32 C
Mumbai
Sunday, November 22, 2026
घरबिजनेससाताऱ्यात अदानी समूहाच्या प्रकल्पाचे काम रोखले

साताऱ्यात अदानी समूहाच्या प्रकल्पाचे काम रोखले

प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

Google News Follow

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात अदानी समूहाच्या ऊर्जा प्रकल्पाच्या कामाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) ब्रेक लावला आहे. पाटण तालुक्यातील सावर्गर गावात सुरू असलेले उत्खनन आणि बांधकाम तातडीने थांबवण्याचे आदेश मंडळाने दिले आहेत. अदानी ग्रीन एनर्जीच्या १,५०० मेगावॅट क्षमतेच्या तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्पाशी संबंधित हे काम सुरू होते. प्रकल्पासाठी कामगारांची तात्पुरती निवासव्यवस्था आणि साहित्य साठवणुकीसाठी जागा तयार केली जात होती.

२० नोव्हेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित जागेची पाहणी केली. यावेळी सावर्गर गावातील गट क्रमांक ३३ आणि ३४ मध्ये आवश्यक परवानग्या न घेता उत्खनन आणि बांधकाम सुरू असल्याचे आढळले. तसेच पर्यावरणविषयक आवश्यक मंजुरी आणि मंडळाची पूर्वसंमती घेतली नसल्याचेही निदर्शनास आले. या प्रकरणी मंडळाचे प्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस यांनी संबंधित काम तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. परवानगी मिळेपर्यंत कोणतेही काम पुन्हा सुरू करू नये, असा स्पष्ट इशाराही कंपनीला देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
बहरीनमधील अमेरिकी तळावर इराणचा क्षेपणास्त्र-ड्रोन हल्ला

इंदिरा गांधींच्या सरकारने पक्ष कार्यकर्त्यांना न्यायाधीश नेमले

उद्घाटनानंतर ‘नितीश सेतू’वर लालू समर्थकांचा हैदोस

पाऱ्यापासून सोनं तयार करण्याचा अमेरिकन कंपनीचा दावा

दरम्यान, साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी या बांधकामाविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. यापूर्वी १३ नोव्हेंबर रोजी वन विभागानेही राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक मंजुरी नसल्याच्या कारणावरून तारळी प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या प्रकल्पाच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.

दुसरीकडे, अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. सावर्गर येथील जागा ही मुख्य प्रकल्पाचा कायमस्वरूपी भाग नसून केवळ तात्पुरत्या बांधकाम सुविधांसाठी वापरली जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मुख्य प्रकल्पासाठी आवश्यक वैधानिक मंजुरी असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. मंडळाला आवश्यक कागदपत्रे आणि खुलासा सादर करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा