32 C
Mumbai
Sunday, November 22, 2026
घरबिजनेसटाटाच्या मालकीच्या जग्वार लँड रोव्हरच्या डिझाईनची नक्कल

टाटाच्या मालकीच्या जग्वार लँड रोव्हरच्या डिझाईनची नक्कल

बीवायडीला युरोपमध्ये कायदेशीर दणका

Google News Follow

चीनची आघाडीची इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी ‘बिल्ड युअर ड्रीम’ (बीवायडी) हिला युरोपियन बाजारपेठेत मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. टाटा मोटर्सच्या मालकीच्या ब्रिटिश लक्झरी कार कंपनी जग्वार लँड रोव्हरने दाखल केलेल्या डिझाईन चोरीच्या खटल्यात डच कोर्टाने बीवायडीविरोधात निकाल दिला आहे. जग्वार लँड रोव्हरच्या लोकप्रिय ‘डिफेंडर’ एसयूव्हीच्या डिझाईनची नक्कल केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने बीवायडीच्या ‘Ti 7’ या एसयूव्हीच्या विक्रीवर संपूर्ण युरोपियन युनियनमध्ये बंदी घातली आहे. २० नोव्हेंबर रोजी देण्यात आलेल्या या निर्णयामुळे युरोपमध्ये वाहन विक्री सुरू करण्याच्या बीवायडीच्या योजनांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, बीवायडीच्या Ti 7 एसयूव्हीचे डिझाईन हे जग्वार लँड रोव्हरच्या युरोपियन युनियनमध्ये नोंदणीकृत डिफेंडरच्या डिझाईन अधिकारांचे उल्लंघन करणारे आहे. दोन्ही वाहनांमधील उंचावलेले शोल्डर, सी-पिलरची रचना, गोलाकार व्हील आर्च, खिडक्यांची जोडलेली रचना आणि एकूण बाह्य आकार यामध्ये मोठे साम्य असल्याचे कोर्टाने नमूद केले. बीवायडीने हेडलाईट, फ्रंट ग्रिल, बोनेट आणि मागील भाग वेगळा असल्याचे सांगत आपली बाजू मांडली. मात्र, सामान्य ग्राहकांनाही दोन्ही गाड्या सारख्याच वाटू शकतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

या निकालानुसार, बीवायडीच्या युरोपमधील दहा उपकंपन्यांना Ti 7 एसयूव्हीची आयात, उत्पादन, साठवणूक आणि विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कंपनीला दररोज एक लाख युरो म्हणजेच सुमारे १.०१ कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे. याशिवाय बंदीचे उल्लंघन करून विकल्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनामागे २५ हजार युरो अतिरिक्त दंड आकारण्याची तरतूदही करण्यात आली आहे. या दंडाची कमाल मर्यादा एक कोटी युरो ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, या निर्णयातून बीवायडीला ब्रिटनमध्ये काहीसा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाचा आदेश केवळ युरोपियन युनियनपुरता मर्यादित असल्याने ब्रिटनमधील कंपनीच्या उपकंपनीला या बंदीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे जानेवारी २०२७ पासून ब्रिटनमध्ये Ti 7 ची डिलिव्हरी सुरू करण्याच्या योजनेवर सध्या परिणाम होणार नाही. दुसरीकडे, बीवायडीने न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे. आपण कोणत्याही कंपनीच्या डिझाईनची नक्कल केलेली नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील कायदेशीर लढाईकडे जागतिक वाहन उद्योगाचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा