33 C
Mumbai
Monday, November 23, 2026
घरविशेषअयोध्या-जनकपूरदरम्यान थेट रेल्वे; ‘शरयू-कमला एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा

अयोध्या-जनकपूरदरम्यान थेट रेल्वे; ‘शरयू-कमला एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा

पंतप्रधान मोदी-बालेन्द्र शाह यांच्या हस्ते रेल्वेसेवेचे उद्घाटन

Google News Follow

भारत आणि नेपाळमधील धार्मिक, सांस्कृतिक आणि दळणवळणाचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी सोमवारी अयोध्या ते जनकपूरदरम्यान धावणाऱ्या ‘शरयू-कमला एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वेसेवेमुळे भारतातील अयोध्या आणि नेपाळमधील जनकपूर ही दोन महत्त्वाची धार्मिक स्थळे थेट रेल्वेमार्गाने जोडली जाणार आहेत.

बालेन्द्र शाह यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. व्यापार, ऊर्जा, जलविद्युत, गुंतवणूक, रेल्वे आणि पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. शाह यांचा पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच द्विपक्षीय परदेश दौरा आहे. त्यांच्या समवेत ३४ सदस्यीय प्रतिनिधीमंडळही भारतात आले आहे. यामध्ये नेपाळचे अर्थमंत्री स्वर्णिम वाग्ले आणि परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत.

‘शरयू-कमला एक्स्प्रेस’ ही रेल्वे अयोध्या कॅन्ट ते जनकपूरधामदरम्यान ६०४ किलोमीटरचे अंतर सुमारे १९ तासांत पार करेल. २८ नोव्हेंबरपासून ही सेवा नियमितपणे सुरू होणार आहे. आठवड्यातून एकदा धावणाऱ्या या रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना मध्ये रेल्वे बदलण्याची गरज भासणार नाही. या मार्गावर मनकापूर, बस्ती, गोरखपूर, नरकटियागंज, रक्सौल, सीतामढी, शिशो, मधुबनी आणि जयनगर ही प्रमुख स्थानके असतील.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींकडून त्रिवेणीचे जल, तर शाह यांच्याकडून रुद्राक्ष भेट

दीपस्तंभावर दिवा लावण्याच्या विरोधात विजय सरकार

केरळमध्ये ११.६ किलो गांजासह युवक काँग्रेस कार्यकर्त्याला अटक

चीनकडून बांगलादेशला क्षेपणास्त्र निर्मितीचा कच्चा माल?

या रेल्वेसेवेमुळे रामायण सर्किटला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. अयोध्या हे प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान, तर नेपाळमधील जनकपूर हे माता सीतेचे जन्मस्थान मानले जाते. त्यामुळे भाविकांना दोन्ही धार्मिक स्थळांना भेट देणे अधिक सोयीचे होणार आहे. धार्मिक पर्यटनासोबतच सीमावर्ती भागातील व्यापार, स्थानिक व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींनाही यामुळे प्रोत्साहन मिळू शकते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा