33 C
Mumbai
Monday, November 23, 2026
घरक्राईमनामामानहानी प्रकरणात ध्रुव राठीविरोधात अजामीनपात्र वॉरंट

मानहानी प्रकरणात ध्रुव राठीविरोधात अजामीनपात्र वॉरंट

दिल्लीतील साकेत न्यायालयाचा आदेश

Google News Follow

यूट्यूबर ध्रुव राठी याच्या अडचणीत वाढ झाली आहे. २०१८ मधील मानहानीच्या एका प्रकरणात दिल्लीतील साकेत न्यायालयाने सोमवारी (२३ नोव्हेंबर) त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. वारंवार समन्स बजावण्यात अडचणी येणे आणि न्यायालयात हजर न राहणे, या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.

संबंधित प्रकरण ‘आय सपोर्ट नरेंद्र मोदी’ या फेसबुक पेजचे संस्थापक विकास पांडे ऊर्फ विकास संकृत्यायन यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीशी संबंधित आहे. मे २०१८ मध्ये ध्रुव राठी याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर ‘बीजेपी आयटी सेल पार्ट २’ या शीर्षकाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओत भाजपच्या आयटी सेलशी संबंधित लोकांनी आपली बदनामी करण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आल्याचा दावा पांडे यांनी केला आहे. हे आरोप खोटे आणि बदनामीकारक असल्याचे सांगत त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

या व्हिडिओची तत्कालीन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही सोशल मीडियावरून पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे त्यांनीही हा व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी मानहानीच्या कारवाईचा सामना केला. फेब्रुवारी २०२४ मध्ये केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात हा व्हिडिओ शेअर करणे ही चूक असल्याचे मान्य केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधातील खटल्याच्या कार्यवाहीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.

हे ही वाचा:

अयोध्या-जनकपूरदरम्यान थेट रेल्वे; ‘शरयू-कमला एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा

पंतप्रधान मोदींकडून त्रिवेणीचे जल, तर शाह यांच्याकडून रुद्राक्ष भेट

दीपस्तंभावर दिवा लावण्याच्या विरोधात विजय सरकार

केरळमध्ये ११.६ किलो गांजासह युवक काँग्रेस कार्यकर्त्याला अटक

दरम्यान, ध्रुव राठी याला यापूर्वी न्यायालयाने समन्स बजावले होते. १७ ऑक्टोबर रोजी त्याच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, ते बजावता आले नव्हते. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी पुन्हा जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. राठी याचे गुरुग्राममधील निवासस्थान बंद असल्याने आणि तो परदेशात राहत असल्याने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याचे तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते. आता वारंवार प्रयत्न करूनही राठी न्यायालयात हजर न झाल्याने न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा