33 C
Mumbai
Monday, November 23, 2026
घरबिजनेसभारत विकसित करतोय जागतिक दर्जाची अंतराळ पायाभूत सुविधा

भारत विकसित करतोय जागतिक दर्जाची अंतराळ पायाभूत सुविधा

फ्रान्स, जपान आणि अमेरिकेसह अनेक देश भागीदार

Google News Follow

भारत जागतिक दर्जाची अंतराळ पायाभूत सुविधा विकसित करत असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात फ्रान्स, जपान आणि अमेरिकेसह अनेक देश भागीदार म्हणून सहभागी होत आहेत, अशी माहिती इंडियन स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष अरुण टी. रामचंद्रनी यांनी सोमवारी दिली.

‘इंडिया इंटरनॅशनल स्पेस कॉन्क्लेव्ह’च्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रामचंद्रनी म्हणाले, “आम्ही भारतात जागतिक दर्जाची अंतराळ पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेने काम करत आहोत. यासाठी फ्रान्स, जपान, अमेरिका आणि जगातील इतर भागांतील देश व संस्थांचे सहकार्य मिळत आहे. त्याचबरोबर भारतीय अंतराळ परिसंस्थेच्या विविध पैलूंचा विकास करण्यावर आणि आतापर्यंत मिळवलेल्या यशाच्या पुढे जात या क्षेत्राचा अधिक विस्तार करण्यावर आमचा भर आहे.”

गगनयान मोहिमेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रामचंद्रनी म्हणाले की, या सर्व विकासात्मक मोहिमा आहेत आणि त्यांचे काम पुढे सुरू आहे. काही सर्वसामान्य आव्हानांचा सामना करावा लागत असला, तरी या मोहिमा अत्यंत यशस्वी ठरतील, असा आम्हाला विश्वास आहे. त्या दिशेनेच आमचे प्रयत्न सुरू आहेत.

या कार्यक्रमादरम्यान इंडियन स्पेस असोसिएशन आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये तसेच खासगी कंपन्यांमध्ये परस्पर सहकार्याच्या माध्यमातून अनेक सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आले आहेत. या करारांमुळे अंतराळ क्षेत्रातील परिसंस्था अधिक मजबूत करण्यासाठी नव्या भागीदारी निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

दादरमध्ये फेरीवाल्यांचे ‘हप्ताराज’; क्यूआर कोडचा काळाबाजार!

पंतप्रधान मोदींकडून त्रिवेणीचे जल, तर शाह यांच्याकडून रुद्राक्ष भेट

दीपस्तंभावर दिवा लावण्याच्या विरोधात विजय सरकार

केरळमध्ये ११.६ किलो गांजासह युवक काँग्रेस कार्यकर्त्याला अटक

दरम्यान, ‘इंडिया इंटरनॅशनल स्पेस कॉन्क्लेव्ह’बाबत आयएएनएसशी बोलताना इंडियन स्पेस असोसिएशनचे महासंचालक आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल कुमार भट्ट यांनी या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये सांगितली.

ते म्हणाले की, या परिषदेत अंतराळ क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर एकूण १२ सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रक्षेपण वाहने, उपग्रहांची निर्मिती, कक्षेतील उपग्रहांचे संचालन, अंतराळात इंधन भरण्याची प्रक्रिया आणि इतर अंतराळविषयक उपक्रमांसह वित्तपुरवठा व सहकार्य या विषयांचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा