31 C
Mumbai
Tuesday, November 24, 2026
घरस्पोर्ट्सविद्यार्थी क्रीडा केंद्र, सरस्वती कन्या संघाला मुंबई जिल्हा अजिंक्यपद!

विद्यार्थी क्रीडा केंद्र, सरस्वती कन्या संघाला मुंबई जिल्हा अजिंक्यपद!

जनार्दन सावंत, जान्हवी लोंढे स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू

Google News Follow

गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या परळच्या विद्यार्थी क्रीडा केंद्राने यंदा पराभवाची सल पुसत मुंबई जिल्हा खो-खो स्पर्धेच्या पुरुष गटात विजेतेपदावर झेप घेतली, तर माहीमच्या सरस्वती कन्या संघाने महिलांमध्ये हॅटट्रिकसह अजिंक्यपदाची मोहर उमटवली! पुरुषांच्या अंतिम सुपर लीग सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने श्री समर्थ व्यायाम मंदिराला अवघ्या एका गुणाने नमवत १२-११ असा थरारक विजय मिळवला. महिलांमध्ये सरस्वतीने ओम साईश्वरवर ४-२ अशी मात करत विजेतेपदाला गवसणी घातली. पुरुषांत जनार्दन सावंत, तर महिलांत जान्हवी लोंढे यांनी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवत स्पर्धेवर आपली छाप उमटवली. ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिराच्या मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली चुरस, खेळाडूंची जिद्द आणि विजेतेपदासाठीची झुंज खो-खोप्रेमींना रोमांचित करणारी ठरली.

पुरुष गटाच्या अंतिम सुपर लीग सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने श्री समर्थ व्यायाम मंदिराचा १२-११ असा एका गुणाने पराभव करत मुंबई जिल्हा अजिंक्यपद पटकावले. गतवर्षी श्री समर्थकडून विरुद्ध उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या विद्यार्थी क्रीडा केंद्राने यंदा त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विजय मिळवत त्या पराभवाची सल भरून काढली. मध्यंतराला श्री समर्थने ६-५ अशी एका गुणाची आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात विद्यार्थी क्रीडा केंद्राने खेळाचा नूर पालटत आक्रमण आणि संरक्षणात जबरदस्त कामगिरी केली. फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत संघाने विजेतेपद खेचून आणले.

हे ही वाचा:

वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; ५३ चेंडूंत २०४ धावा!

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक!

पुस्तकांचा खजिना वाचकांच्या भेटीला! मुंबई पुस्तक महोत्सवाला सुरुवात

पेपरफुटी करणाऱ्यांवर आता १० कोटींचा दंड

विद्यार्थी क्रीडा केंद्राच्या जनार्दन सावंत, प्रतीक घाणेकर, शुभम शिंदे, सम्यक जाधवने विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रत्येक क्षणाला रणनीती, आक्रमकता, संयम आणि जिद्दीचे दर्शन घडवत या चौघांनी विजेतेपदाचा पाया भक्कम केला. तर पराभूत श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या हितेश आग्रे, वेदांत देसाई, पियुष घोलम विद्यार्थी क्रीडा केंद्राला कडवी झुंज दिली.

महिला गटाच्या अंतिम सुपर लीग सामन्यात सरस्वती कन्या संघाने ओम साईश्वर सेवा मंडळाचा ४-२ असा दोन गुणांनी पराभव करत मुंबई जिल्हा अजिंक्यपदावर नाव कोरले. जान्हवी लोंढे, खुशबू सुतारने चमकदार कामगिरी केली. पराभूत ओम साईश्वर सेवा मंडळाच्या वैष्णवी परब, निर्मिती परब, कादंबरी तेरवणकरने सरस्वतीला कडवी झुंज दिली.

उत्कृष्ट कामगिरी

सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू (पुरुष) : जनार्दन सावंत – विद्यार्थी क्रीडा केंद्र

सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू (महिला) : जान्हवी लोंढे – सरस्वती कन्या

उत्कृष्ट आक्रमक (पुरुष) : हितेश आग्रे – श्री समर्थ

उत्कृष्ट आक्रमक (महिला) : श्रिया नाईक – श्री समर्थ

उत्कृष्ट संरक्षक (पुरुष) : प्रतीक घाणेकर – विद्यार्थी क्रीडा केंद्र

उत्कृष्ट संरक्षक (महिला) : वैष्णवी परब – ओम साईश्वर

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा