31 C
Mumbai
Tuesday, November 24, 2026
घरक्राईमनामापोलिसांची बतावणी करून आफ्रिकन नागरिकांना लुटणारी टोळी गजाआड

पोलिसांची बतावणी करून आफ्रिकन नागरिकांना लुटणारी टोळी गजाआड

९७.५ लाखांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत

Google News Follow

पोलिस असल्याची बतावणी करून दोन परदेशी नागरिकांची तब्बल ९७ लाख ५० हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या आरोपींना आझाद मैदान पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी लुटलेली १०० टक्के रक्कम हस्तगत केली आहे.

मध्य आफ्रिकेतील चाड देशातील रहिवासी असलेल्या दारसिला मारजानाडापक या त्यांच्या एका परदेशी मैत्रिणीसह मुंबईत आल्या होत्या. २० नोव्हेंबर रोजी दोघीही धनजी स्ट्रीट येथून कुलाब्याच्या दिशेने टॅक्सीने प्रवास करत होत्या. त्यांच्याकडे रोख रक्कम असलेली बॅग होती. धनजी स्ट्रीटपासूनच आरोपी दुचाकीवरून त्यांच्या टॅक्सीचा पाठलाग करत होते. मेट्रो सिनेमाजवळ आरोपींनी टॅक्सीचालकाला आपण पोलिस असल्याचे सांगून टॅक्सी थांबवली. त्यानंतर पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करत या दोन्ही महिलांकडील पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून आरोपींनी तेथून पळ काढला.

हे ही वाचा:

शरणकुमार लिंबाळे अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक!

वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; ५३ चेंडूंत २०४ धावा!

पेपरफुटी करणाऱ्यांवर आता १० कोटींचा दंड

या घटनेनंतर आझाद मैदान पोलिस ठाण्यात २० नोव्हेंबर रोजी रात्री ११.१९ वाजता भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले आणि खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले.

मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिस पथकांनी चेंबूर, कळवा, ठाणे आणि अहिल्यानगर येथे शोधमोहीम राबवली. अवघ्या ४८ तासांत आरोपींचा माग काढत पोलिसांनी टाकळी ढोकेश्वर येथून त्यांना ताब्यात घेतले आणि चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त मनीष कलवानिया, सहायक पोलिस आयुक्त निलेश बागुल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू बिडकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमृत पवार आणि पोलिस निरीक्षक नंदकिशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदान पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कामगिरी फत्ते केली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा