31 C
Mumbai
Tuesday, November 24, 2026
घरक्राईमनामा‘रामायण’ चित्रपट निर्माते, दिग्दर्शकाविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार

‘रामायण’ चित्रपट निर्माते, दिग्दर्शकाविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार

प्रभू श्रीरामाचा अवमान, रावणाचे उदात्तीकरण केल्याचा आरोप

Google News Follow

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मूळ वाल्मीकी रामायणाशी कथित छेडछाड करून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गंभीर आरोप नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रामायण: राइज ऑफ ए लिजेंड’ या चित्रपटावर करण्यात आला आहे. याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते सतीश कोचरेकर यांनी मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे.

प्रभू श्रीरामाचा अवमान आणि रावणाचे अवाजवी उदात्तीकरण केल्याप्रकरणी दोघांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, या चित्रपटात अत्याचारी रावणाला गरिबांना सोन्याची घरे देणारा, शोषितांचा तारणहार आणि महिलांच्या सन्मानाचा रक्षक म्हणून दाखवून त्याचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. याउलट, अस्त्र-शस्त्रांनी सुसज्ज असलेले प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे ताटिका व खर-दूषण यांच्या राक्षसी सेनेसमोर घाबरून पळ काढताना दाखवले आहेत, तर निशस्त्र रावण विशाल सेनेसमोर निर्भयपणे उभा असल्याचे चित्रित केले आहे. तसेच, शूर्पणखा प्रसंगावरून माता सीतेने लक्ष्मणाला फटकारणे, श्रीरामांनी खर-दूषण यांची क्षमा मागणे आणि लक्ष्मणाला उद्धट व गुरुजनांचा उपहास करणारा दाखवून पूजनीय पात्रांचे जाणीवपूर्वक अवमूल्यन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

शरणकुमार लिंबाळे अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

प्रकाश आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर

विद्यार्थी क्रीडा केंद्र, सरस्वती कन्या संघाला मुंबई जिल्हा अजिंक्यपद!

वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; ५३ चेंडूंत २०४ धावा!

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९९ आणि कलम १९६ अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी समितीने केली आहे. यासोबतच, तपासासाठी चित्रपटाची अधिकृत प्रत, पटकथा, संवाद आणि उपशीर्षके (सबटायटल्स) जप्त करून आक्षेपार्ह दृश्यांचे अचूक टाइमस्टॅम्प सुरक्षित ठेवण्यात यावेत, तसेच वाल्मीकी रामायण आणि धर्मशास्त्रातील तज्ज्ञांचे मत घेतले जावे, अशी विनंतीही पोलिसांकडे करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा