30 C
Mumbai
Wednesday, November 25, 2026
घरबिजनेसअमेरिकेचा भारतासह १६ देशांना टॅरिफचा इशारा

अमेरिकेचा भारतासह १६ देशांना टॅरिफचा इशारा

व्यापार करारावरही परिणामाची शक्यता

Google News Follow

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह १६ देशांवर पुन्हा आयात शुल्क वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. औद्योगिक उत्पादनांमध्ये सरकारी अनुदान आणि आर्थिक मदतीमुळे परदेशी कंपन्यांना अनुचित स्पर्धात्मक फायदा मिळत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाकडून (यूएसटीआर) सुरू असलेल्या तपासाचा निष्कर्ष याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांसमोर नव्या शुल्काचे आव्हान निर्माण झाले आहे.

‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, या तपासाच्या कक्षेत भारत, चीन, युरोपीय संघ, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, व्हिएतनाम, तैवान, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, स्वित्झर्लंड, नॉर्वे, सिंगापूर, बांगलादेश आणि कंबोडिया या १६ अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. या देशांमधील सरकारे स्थानिक उद्योगांना अनुदान आणि आर्थिक मदत देत असल्याने तेथील कंपन्या कमी किमतीत उत्पादन करून अमेरिकी बाजारपेठेत स्पर्धा करतात. याचा फटका अमेरिकेतील उत्पादकांना बसत असल्याचा दावा ट्रम्प प्रशासनाने केला आहे.

नव्या शुल्काचे अंतिम दर अद्याप निश्चित झालेले नाहीत. मात्र, भारत आणि व्हिएतनामवर जपान, युरोपीय संघ आणि दक्षिण कोरियाच्या तुलनेत अधिक शुल्क लागू होण्याची शक्यता आहे. या तीन अर्थव्यवस्थांनी अमेरिकेसोबत व्यापारविषयक करार केले असल्याने त्यांच्यावरील शुल्क १५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी राहू शकते. प्रस्तावित शुल्क बहुतांश निर्यात उत्पादनांवर लागू होण्याची शक्यता असून पोलाद, ऍल्युमिनियम आणि मोटारगाड्यांना त्यातून वगळले जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

दिल्लीतील कॅफेमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

विक्रोळीत घरात घुसून अतिप्रसंग करू पाहणाऱ्या अनासला चोप

अरुणाचल सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये दहा दिवस चर्चा

पेपरफुटी करणाऱ्यांवर आता १० कोटींचा दंड

या घडामोडींचा भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारावरही परिणाम होऊ शकतो. फेब्रुवारी २०२६ मध्ये दोन्ही देशांनी अंतरिम व्यापार कराराची रूपरेषा जाहीर केली होती. त्यानुसार, भारतीय वस्तूंवरील अमेरिकी शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे आणि रशियन तेल खरेदीच्या मुद्द्यावर लावलेला अतिरिक्त २५ टक्के दंडात्मक कर हटवण्याचे मान्य झाले होते. मात्र, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये ट्रम्प प्रशासनाने आणीबाणीच्या अधिकारांतर्गत लादलेले व्यापक आयात शुल्क रद्द केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा