28 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरक्राईमनामापासपोर्टमधील त्रुटींप्रकरणी सौरव दास विरोधात लूकआऊट सर्क्युलर

पासपोर्टमधील त्रुटींप्रकरणी सौरव दास विरोधात लूकआऊट सर्क्युलर

केंद्र सरकारची दिल्ली उच्च न्यायालयात माहिती

Google News Follow

कॉकरोच जनता पार्टीचा (सीजेपी) सहसंयोजक आणि प्रवक्ता सौरव दास याच्याविरोधात पासपोर्टमधील कथित विसंगतींप्रकरणी लूकआऊट सर्क्युलर (एलओसी) जारी करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाला दिली. पासपोर्टमधील त्रुटींचा त्याच्या भारतीय नागरिकत्वावरही परिणाम होऊ शकतो, असे सरकारने न्यायालयात सांगितले. मात्र, एलओसी जारी झाल्याची माहिती आपल्याला देण्यात आली नव्हती, असे सौरव दास याच्या वकिलांनी सांगितले. परदेश प्रवासाची परवानगी नाकारण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या त्याच्या याचिकेवर न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे.

सौरव दास २३ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणार होता. मात्र, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याच्या पासपोर्टमधील तपशीलांमध्ये विसंगती असल्याचे सांगत त्याला विमानात बसण्यापासून रोखले. त्यानंतर सौरव दास याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. आपला परदेश प्रवास रोखण्यासंदर्भातील कोणताही आदेश दाखवण्यात आला नसल्याचा दावा त्याने केला होता.

हे ही वाचा:

गुजरातमध्ये महामार्गावर उतरली लष्कराची विमाने

पाकिस्तानचे हित जपणारा पक्ष म्हणजे काँग्रेस!

संविधान कमकुवत करणाऱ्यांच्याच हाती पाच दशके सत्ता

काश्मीरमधून गायब झालेले ३० जण पाकिस्तानात सक्रिय

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी २५ नोव्हेंबर रोजी सांगितले की, चेन्नईच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने २३ नोव्हेंबरला दास यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पासपोर्टमध्ये नमूद केलेल्या जन्मस्थळाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. स्पष्टीकरण सादर करेपर्यंत पासपोर्टचा वापर करू नये, असेही त्याला कळवण्यात आले आहे. सौरव दास यांचा पासपोर्ट २०१९ मध्ये जारी करण्यात आला होता. याच पासपोर्टवरून यापूर्वी परदेशात प्रवास केल्याचे त्याने सांगितले आहे. ऑक्सफर्ड युनियनच्या १ डिसेंबर रोजी होणाऱ्या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी तो लंडनला जाणार होता.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा