29.5 C
Mumbai
Saturday, November 28, 2026
घरविशेषबांद्रा टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक

बांद्रा टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लॉक

अनेक रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल

Google News Follow

मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरील सिमेंट काँक्रीट (सीसी) एप्रनच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी तब्बल ७५ दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक १ डिसेंबर २०२६ ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत लागू राहणार आहे. या कामामुळे मुंबईतून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रारंभिक तसेच अंतिम स्थानकांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना रेल्वेच्या नव्या वेळापत्रकाची नोंद घेणे आवश्यक आहे.

या ब्लॉकदरम्यान काही एक्स्प्रेस गाड्या वांद्रे टर्मिनसऐवजी दादर स्थानकातून सोडण्यात येणार आहेत, तर काही गाड्या दादरऐवजी वांद्रे टर्मिनसवरून धावतील. भुज-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस दादर येथे थांबवण्यात येणार असून परतीची गाडी दादरवरून सायंकाळी ५.४० वाजता सुटेल. तसेच अजमेर, श्रीगंगानगर आणि भगत की कोठी या मार्गांवरील काही एक्स्प्रेस गाड्यांचे अंतिम आणि प्रारंभिक स्थानक बदलण्यात आले आहे. या गाड्या वांद्रे टर्मिनसवरून दुपारी २.५५ वाजता रवाना होतील. त्यामुळे संबंधित मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीटावरील स्थानक तपासूनच प्रवासाला निघावे.

हे ही वाचा:
भारताच्या परकीय चलनसाठ्याला पुन्हा मोठा धक्का

आठ कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी सेबीची मंजुरी

ऊर्जा क्षेत्रात २०० लाख कोटींच्या गुंतवणुकीची संधी

भारतीय शेअर बाजाराची सात महिन्यांत ९ लाख कोटींची कमाई

याशिवाय भुज, उधना, मडगाव, जयपूर आणि दौराई येथून मुंबईत येणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्या वांद्रे टर्मिनसऐवजी बोरिवली स्थानकावरच थांबवण्यात येणार आहेत. तर उधना, मडगाव, जयपूर आणि दौराईकडे जाणाऱ्या काही गाड्या वांद्रे टर्मिनसऐवजी बोरिवली स्थानकातून सुटतील. यामध्ये उधना एक्स्प्रेस सकाळी ९.४० वाजता, मडगाव एक्स्प्रेस सकाळी ७.२५ वाजता, तर जयपूर आणि दौराई एक्स्प्रेस सकाळी ९.२५ वाजता बोरिवलीहून रवाना होतील. त्यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाच्या ठिकाणानुसार बोरिवली किंवा दादर स्थानक गाठावे लागणार आहे.

दरम्यान, या ७५ दिवसांच्या ब्लॉकचा परिणाम उपनगरीय लोकल सेवांवरही होणार आहे. चर्चगेट-बोरिवली मार्गावरील दुपारी २.५० वाजताची फास्ट लोकल, बोरिवली-चर्चगेट मार्गावरील दुपारी ३.४० वाजताची स्लो लोकल, सायंकाळी ५.२८ वाजताची एसी फास्ट लोकल आणि बोरिवलीहून सायंकाळी ६.२४ वाजता सुटणारी एसी फास्ट लोकल अशा चार सेवा १ डिसेंबरपासून १३ फेब्रुवारीपर्यंत रद्द राहणार आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अरुण कुमार मीणा यांनी याबाबत माहिती दिली. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रवासापूर्वी गाड्यांचे वेळापत्रक आणि बदललेली स्थानके तपासावीत, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा