32 C
Mumbai
Saturday, November 28, 2026
घरबिजनेसआठ कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी सेबीची मंजुरी

आठ कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी सेबीची मंजुरी

गुंतवणूकदारांसाठी नवी संधी

Google News Follow

भारतीय शेअर बाजारातील प्राथमिक भांडवली बाजारात पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. भांडवली बाजार नियामक सेबीने आठ कंपन्यांना प्रारंभिक समभाग विक्री अर्थात आयपीओ आणण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामध्ये अनन्या बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्रा मायक्रोफिन आणि वेदांता समूहातील स्टरलाइट इलेक्ट्रिकल या कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय गौरिक फॅशन्स, एमराल्ड ज्वेल इंडस्ट्री इंडिया, ब्युटी गॅरेज, नोबल हायजीन, एमपी स्टील (इंडिया) आणि कटारिया धुलचंद पन्नालाल ज्वेलर्स या कंपन्यांनाही सेबीकडून हिरवा कंदील मिळाला आहे. या निर्णयामुळे आगामी काळात गुंतवणूकदारांना विविध क्षेत्रांतील कंपन्यांच्या आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध होऊ शकते.

या आठ कंपन्यांमध्ये स्वातंत्रा मायक्रोफिनच्या प्रस्तावित आयपीओकडे विशेष लक्ष लागले आहे. कंपनी या माध्यमातून सुमारे ३ हजार कोटी रुपये उभारणार आहे. यामध्ये १ हजार ५०० कोटी रुपयांचे नवीन समभाग जारी केले जाणार असून, उर्वरित १ हजार ५०० कोटी रुपयांचे समभाग विद्यमान गुंतवणूकदार विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहेत. तर स्टरलाइट इलेक्ट्रिक ही कंपनी १.६ कोटी नवीन समभाग जारी करण्याच्या तयारीत आहे. वेदांता समूहाशी संबंधित असलेली ही कंपनी वीज केबल्स आणि विद्युत वाहक उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे.
हे ही वाचा:
ऊर्जा क्षेत्रात २०० लाख कोटींच्या गुंतवणुकीची संधी

मुंबईतील बॉम्बस्फोट धमक्यांमागे बनावट ई-मेलचे जाळे

भारतीय शेअर बाजाराची सात महिन्यांत ९ लाख कोटींची कमाई

गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

दरम्यान, इतर कंपन्यांचे आयपीओही वेगवेगळ्या क्षेत्रांतील गुंतवणुकीच्या संधी निर्माण करणार आहेत. नोबल हायजीन कंपनी १५० कोटी रुपयांपर्यंतचे नवीन समभाग जारी करणार आहे. ब्युटी गॅरेज १२५ कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे, तर एमपी स्टील (इंडिया) कंपनीचा नवीन समभाग विक्रीचा प्रस्ताव ९५ कोटी रुपयांचा आहे. गौरिक फॅशन्स आणि कटारिया धुलचंद पन्नालाल ज्वेलर्स या कंपन्यांचाही आयपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, याच काळात बीविशाल ऑइल अँड एनर्जी आणि पेंटॅकल कन्सल्टंट्स या दोन कंपन्यांनी आपले आयपीओ प्रस्ताव मागे घेतले आहेत. सेबीकडून निरीक्षणे जारी होणे हा आयपीओ प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असला, तरी प्रत्यक्ष आयपीओसाठी कंपन्यांना पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतरच आयपीओची तारीख आणि किंमतपट्टा जाहीर होईल. त्यामुळे आगामी काळात प्राथमिक बाजारात नव्या कंपन्यांची भर पडण्याची शक्यता आहे. मात्र गुंतवणूकदारांनी केवळ आयपीओची लोकप्रियता न पाहता संबंधित कंपनीची आर्थिक स्थिती, व्यवसाय आणि भविष्यातील वाढीची क्षमता तपासूनच गुंतवणुकीचा निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा