32 C
Mumbai
Saturday, November 28, 2026
घरविशेषसंघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत ५६ एकरांवर ‘राष्ट्र वंदनम्’

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत ५६ एकरांवर ‘राष्ट्र वंदनम्’

सरसंघचालक मोहन भागवतांसह वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार

Google News Follow

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी वर्षानिमित्त राजधानी दिल्लीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील रोहिणी सेक्टर २३ येथील डीडी ग्राउंडवर २९ नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्र वंदनम्’ हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी तब्बल ५६ एकर परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह संघाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

संघाच्या दिल्ली प्रांताच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमासाठी आतापर्यंत १ लाख ६० हजारांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. यामध्ये सुमारे १० हजार महिलांचा समावेश आहे. कार्यक्रमाला जवळपास दोन लाख नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. स्वयंसेवकांसोबतच समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या नागरिकांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळाला ‘समरसता स्थळ’ असे नाव देण्यात आले आहे.

१०१ फूट उंच ध्वज, ८०० स्वयंसेवकांचे घोषवादन

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे १०१ फूट उंचीचा ध्वज आणि संघाच्या पारंपरिक घोषवादनाचे सादरीकरण असणार आहे. यासाठी सुमारे ८०० स्वयंसेवक सराव करत आहेत. मीरा, तिलंग, उदय आणि श्रीराम यांसह पाच विशेष रचनांचे सादरीकरण केले जाणार आहे. कार्यक्रमस्थळी १६ फूट उंचीचे मुख्य व्यासपीठ आणि १२ फूट उंचीचे दुसरे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. तसेच संपूर्ण परिसराची केदार नगर, सारंग नगर आणि कल्याण नगर अशा तीन विभागांत विभागणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

मुंबईतील बॉम्बस्फोट धमक्यांमागे बनावट ई-मेलचे जाळे

पक्ष फोडणाऱ्यांच्या चरणाशी जाणे म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवणे

गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसणारा!

या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान चार दिवसीय घोष प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात येत आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांचे पुनर्चक्रण करण्यासाठी कार्यक्रमस्थळी विशेष यंत्रणा बसवण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा