32 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरविशेषझारखंडमध्ये भीषण अपघातात १३ भाविकांचा मृत्यू

झारखंडमध्ये भीषण अपघातात १३ भाविकांचा मृत्यू

पंतप्रधानांकडून आर्थिक मदत जाहीर

Google News Follow

झारखंडमधील रामगढ जिल्ह्यात रांची-पाटणा महामार्गावर रविवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात १३ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये चार मुले आणि चार महिलांचा समावेश आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील जंघारो गावातील १४ जण स्कॉर्पिओ वाहनातून झारखंडमधील प्रसिद्ध रजरप्पा मंदिरात दर्शनासाठी जात होते. मात्र, पहाटेच्या सुमारास त्यांच्या प्रवासाचा भीषण दुर्घटनेत अंत झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३३ वर पैंकी गावाजवळ पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव स्कॉर्पिओ वाहनाची महामार्गावरील अन्य वाहनाला धडक बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की वाहनाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
हे ही वाचा:
म्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणुकीत साडेतीन पट वाढ

ब्रिटनमध्ये मुस्लिमांशी संवाद साधताना संवेदनशील राहा, महिलांशी चांगले वर्तन करा

लग्नसराई – सणासुदीच्या खरेदीमुळे महागाईचा धोका वाढणार

खोल समुद्रातील तेल उत्खननाला केंद्राचा वेग

रामगढ सदर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या १४ प्रवाशांपैकी १३ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. एकमेव बचावलेल्या प्रवाशाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनाचा वेग किती होता आणि दुसऱ्या वाहनाची भूमिका काय होती, याचा तपास केला जात आहे. मृतांचे शवविच्छेदन आणि कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या दुर्घटनेमुळे बिहारमधील जंघारो गावावर शोककळा पसरली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमी व्यक्तीला ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा