32 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरविशेषत्रिपुरात बीएसएफ जवानांवरील हल्ला करणाऱ्यांच्या घरांवर हातोडा

त्रिपुरात बीएसएफ जवानांवरील हल्ला करणाऱ्यांच्या घरांवर हातोडा

आतापर्यंत २४ जणांना अटक

Google News Follow
त्रिपुरातील सिपाहीजाला जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्याच्या एका महिन्यानंतर सुरक्षा दल आणि जिल्हा प्रशासनाने सीमावर्ती भागातील बीएसएफ, सरकारी तसेच वन विभागाच्या जमिनीवरील अवैध अतिक्रमणांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. रविवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सिपाहीजाला जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत सीमेलगतच्या सोनामुरा आणि विशालगड उपविभागांमध्ये त्रिपुरा सार्वजनिक परिसर (अनधिकृत कब्जाधारकांची बेदखली) अधिनियम, १९८२ अंतर्गत ५० हून अधिक अवैध अतिक्रमणे हटवली आहेत.
ज्या लोकांची बांधकामे पाडण्यात आली आहेत, त्यापैकी काही जणांवर अलीकडेच बीएसएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यासह अन्य गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. तर काहींनी सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला होता, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी करण्यात आलेल्या ताज्या कारवाईत बीएसएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांनी बीएसएफच्या ताब्यातील जमिनीवर कथितरीत्या बांधलेली पाच घरे आणि दोन दुकाने जमीनदोस्त केली. याशिवाय वन विभागाच्या जमिनीवर अवैधरित्या बांधण्यात आलेली आणखी दोन घरेही पाडण्यात आली.

जिल्हा प्रशासन, पोलीस, बीएसएफ आणि वन विभागाने ही संयुक्त कारवाई सिपाहीजाला जिल्ह्यातील बॉक्सनगर परिसरात केली. भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवरील कलमचौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशाबाडी गावात २ नोव्हेंबर रोजी बीएसएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली होती.

त्रिपुरा पोलिसांचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे महानिरीक्षक (आयजी) मांचक इप्पर यांनी सांगितले की, या हल्ल्याच्या प्रकरणात आतापर्यंत पाच महिलांसह एकूण २४ जणांना अटक करण्यात आली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा आणि महसूल अधिकाऱ्यांनी संयुक्त तपास करून अवैध बांधकामांची ओळख पटवली होती. संबंधितांना नोटिसा बजावल्यानंतर आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अतिक्रमणे हटवण्याची कारवाई करण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

विमान वाहतूक क्षेत्रात अदानी समूहाची मोठी झेप

भारताची रशियन तेलाची आयात घटली

विनोद कांबळीच्या उपचाराचा खर्च एकनाथ शिंदे करणार!

‘८५०’चा आकडा लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी

शनिवारी झालेल्या या कारवाईत १०० हून अधिक सुरक्षा कर्मचारी सहभागी झाले होते. याशिवाय अनेक अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून अवैध अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी व्यापक शोधमोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. या हल्ल्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सुमारे ५० महिला आणि पुरुष सहभागी असल्याचा आरोप आहे.

अटक करण्यात आलेल्या सर्व २४ आरोपींविरोधात अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (एनडीपीएस), १९८५, भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम, १९८४ मधील विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवरून बांगलादेशात गांजाची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कथित तस्करांच्या एका गटाला बीएसएफ जवानांनी रोखले होते. त्यावेळी ही घटना घडली.

तस्करीचा प्रयत्न रोखल्यानंतर सुमारे ५० महिला आणि पुरुषांच्या जमावाने बीएसएफ जवानांना घेराव घालून त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात कंपनी कमांडरसह बीएसएफचे किमान चार जवान जखमी झाले होते. त्यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाली होती. हल्लेखोरांनी एका बीएसएफ जवानाकडील पंप-ऍक्शन गन (पीएजी) हिसकावून घेतली होती आणि बीएसएफच्या एका वाहनाचेही नुकसान केले होते, असा आरोप आहे. या घटनेत हल्लेखोरांपैकी एक जणही जखमी झाला होता. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा