32 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरविशेषछत्तीसगडमध्ये २० लाखांचे बक्षीस असलेल्या पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये २० लाखांचे बक्षीस असलेल्या पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

पोलीस अधीक्षक निखिल राखेचा यांची माहिती

Google News Follow

छत्तीसगडमधील कांकेर येथे २० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या पाच नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यांनी आपल्याकडील स्वयंचलित शस्त्रेही पोलिसांच्या स्वाधीन केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक निखिल राखेचा यांनी दिली. पोलीस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, शरण आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये ‘चंदर’ नावाचा एक डिव्हिजन कमांडर, दोन एरिया कमांडर आणि दोन पक्ष सदस्यांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षकांनी पुढे सांगितले की, राज्य सरकारच्या ‘माओवादी शरणागती आणि पुनर्वसन धोरणां’तर्गत, या नक्षलवाद्यांना आर्थिक मदत, कौशल्य विकास प्रशिक्षण, गृहनिर्माण, शिक्षण, तसेच स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे त्यांना आपले आयुष्य नव्याने सुरू करण्यास आणि मुख्य प्रवाहात सामील होण्यास मदत होईल.

हे ही वाचा:

कॅलिफोर्नियात ५.० तीव्रतेचा भूकंप; ४० हून अधिक धक्के

दीड लाख लोकांच्या उपस्थितीत पार पडले ‘राष्ट्रवंदनम’

झारखंडमध्ये भीषण अपघातात १३ भाविकांचा मृत्यू

लग्नसराई – सणासुदीच्या खरेदीमुळे महागाईचा धोका वाढणार

छत्तीसगड सरकार आणि मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस्तर विभागातील पुनर्वसन केंद्रांमध्ये ग्रामोद्योग विभागाने आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांसाठी विणकाम प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. ग्रामोद्योग सचिव राजेश राणा म्हणाले, “या उपक्रमांतर्गत आम्ही नक्षलवाद्यांना चार महिन्यांचे प्रशिक्षण देतो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, आम्ही त्यांना त्यांच्या घरीच एक हातमाग (लूम) उपलब्ध करून देऊ, जेणेकरून त्यांना उपजीविकेचे साधन मिळेल.” राणा यांनी पुढे सांगितले की, “आम्ही बस्तर विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये हे प्रशिक्षण सुरू केले आहे. सध्या दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि सुकमा येथील विविध पुनर्वसन केंद्रांमध्ये हे प्रशिक्षण सुरू आहे.”

 

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा