29.6 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरक्राईमनामाधक्कादायक!! ७० वर्षीय वृद्धेवर अतिप्रसंग करून केली हत्या

धक्कादायक!! ७० वर्षीय वृद्धेवर अतिप्रसंग करून केली हत्या

Google News Follow

पामबीच जवळील पुलाखाली मिळून आलेल्या ७० महिलेच्या मृतदेहाची तिच्या हातावरील गोंदणावरून (टॅटू ) पटली आहे. त्या महिलेवर जो प्रसंग गुदरला त्याचा छडा लागल्यावर पोलिसांनाही धक्का बसला.

२६ वर्षाच्या तरुणाने या वयोवृद्ध महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने विरोध करताच तिची हत्या करण्यात आल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांना दिली आहे.

वाशी येथील पामबीच जवळ असणाऱ्या पुलाखाली वाशी पोलिसांना २० दिवसापूर्वी एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. या महिलेची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस होताच पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी नवी मुंबई तसेच जवळपास असलेल्या शहरातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधला होता. विविध पोलीस ठाण्यातील हरवलेल्या व्यक्तीची माहिती मिळवून ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु असताना मृतदेहांच्या हातावरील गोंदणा वरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.

गोवंडी परिसरात राहणारी ७० वर्षीय महिला ही महिन्याभरापासून बेपत्ता असल्याचे तपास पथकाला समजताच या महिलेच्या नातलगांशी संपर्क साधण्यात आला. हरवलेली महिला आणि पोलिसांना सापडलेल्या मृत महिलेच्या हातावरील गोंदण मिळते जुळते असल्याचे तपासात उघड झाले. मृत महिलेची ओळख तर पटली होती, मात्र ती गोवंडीत कशी आली, तिची हत्या कोणी केली याचा तपास पोलिसांनी सुरू केला.

तपास पथकाने वाशीतील रेल्वे स्थानक तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता इनऑर्बिट मॉल येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हि महिला एका तरुणा सोबत जाताना दिसून आली. तपास पथकाने फुटेजमधील तरुणाचा शोध घेत परिसरात फेरीवाले, भिकारी, दुकानदार यांच्याकडे चौकशी सुरु केली असता या मुलाच्या फुटेजमधील हालचालीवर बारकाईने लक्ष दिले असता तो सारखे सारखे केस उडविणे, सतत मान वर करणे, पाय झटकणे या सवयीमुळे काही लोकांनी त्याला ओळखले कानिफनाथ कांबळे (२६) असे या तरुणाचे नाव असून तो फुटपाथवर राहण्यास आहे.

हे ही वाचा:

का झाला आहे वांद्रे वर्सोवा ‘स्लो’ लिंक?

ज्वेलर हत्याप्रकरणात ते दोन आरोपी सापडले

अरेरे! रक्षाबंधनाच्या दिवशी गर्भवती भगिनीचा खड्ड्यामुळे झाला अपघात

अफगाणिस्तानातून भारतात आलेल्यांना अश्रु झाले अनावर

पोलिसांनी वाशीतील फुटपाथवर शोध घेतला असता तो पामबीचजवळ पोलिसांना मिळून आला. वाशी पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता या वयोवृद्ध महिलेला जेवण देतो असे सांगून तो पामबीच येथील पुलाखाली घेऊन आला व त्या ठिकाणी त्याने या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता महिलेने विरोध करताच त्याने जवळच पडलेल्या काचेचा तिच्या गळ्यावर वार करून दगडाने डोके ठेचून हत्या केली. त्यानंतर मृतदेहा एका गोणीत अर्धवट भरून पुलाखाली कचऱ्याजवळ टाकून पळून गेला होता अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी वाशी पोलिसांनी कानिफनाथ कांबळे याला अटक करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा