पत्नीने घेतली उच्च न्यायालयात धाव
मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी चार महिन्यांपासून विभक्त राहणाऱ्या पत्नीला पोटगी दिलेली नाही. याबाबत त्यांच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर सुनावणी देत उच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांना लवकरात लवकर पोटगी देण्याचे निर्देश दिले आहेत.
नागराळेपासून विभक्त राहणाऱ्या प्रतिमा यांनी गेल्या चार महिन्यांपासून आपल्याला पोटगी दिली नसल्याचा दावा आपल्या अर्जात केला आहे. तर त्यांचे पती आयपीएस अधिकारी आहेत. आपल्या पतीचा पगार वेळोवेळी वाढत आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत. सध्याची पोटगीची रक्कम वाढविण्यासाठी आणि नागपूर किंवा पुण्यात घर मिळवून देण्याची मागणी याचिकेत केली आहे. यावर खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून पुढील सुनावणी ६ डिसेंबर रोजी होणार आहे.
हे ही वाचा:
कोरोनाचा नवा व्हेरियन्ट ऑमिक्रॉनची चर्चा
नव्या व्हेरियंटचा, नवी नियमावली
‘अर्जुन खोतकर मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्ससाठी १०० एकर जागा हडपण्याच्या प्रयत्नात’
किशोर खोखो संघांच्या कर्णधारपदी सोत्या वळवी आणि सानिका चाफे!!.
मार्च २००८ मध्ये, नागराळे यांच्या पत्नी प्रतिमा यांनी पती हेमंत नागराळे यांच्या विरोधात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह सरकारी खात्यांना तक्रार पत्र लिहिले होते. प्रतिमाने तिच्या तक्रारीत म्हटले होते कि, तिच्या पतीने तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि तिला मानसिक विकारांनी ग्रासले असल्याचे म्हणून रुग्णालयात दाखल करण्याची धमकी दिली होती. तक्रारीनंतर, प्रतिमाला १ कर्मचारी संरक्षण आणि एक जवान तिच्यासोबत असायचा.
सन २०११ मध्ये नगराळे पती पत्नीचा घटस्फोट झाला आहे. कुटुंब न्यायालयाने त्यांना रुपये २०००० पोटगी मंजूर केली होती.







