32 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरविशेषमिर्झापूरच्या ललितचा मृतदेह आढळला

मिर्झापूरच्या ललितचा मृतदेह आढळला

Google News Follow

Related

मिर्झापूर या वेबसिरीजमध्ये मुन्ना भैय्याचा मित्र ललितची भूमिका साकारणाऱ्या ब्रह्मा मिश्रा यांचे निधन झाले आहे. समोर आलेल्या बातमीनुसार, २९ नोव्हेंबर रोजी अभिनेत्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली आणि डॉक्टरांना भेट दिली होती. डॉक्टरांनी गॅसचे औषध दिल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र, नंतर तो त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला. ब्रह्मा गेल्या चार वर्षांपासून भाड्याच्या घरात एकटाच राहत होता.

ब्रह्मा मिश्रा हे मुंबईतील एनलक्स नगर सोसायटीत राहत होते, त्यांचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला. दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता ते आतून बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे डुप्लिकेट चावी बनवण्यासाठी कुलूप लावणाऱ्याला बोलावण्यात आले. फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर बाथरूममधून दुर्गंधी येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी बाथरूमचे दार उघडले असता ब्रह्माचा मृतदेह अर्ध कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

हे ही वाचा:

ओमिक्रॉनचा भारतात प्रवेश; कर्नाटकमध्ये आढळले ओमिक्रॉनचे दोन रुग्ण

भारतीय ऍप ‘कू’ने मिळवला ‘हा’ सन्मान

भाजपाने सुरू केली मथुरेची तयारी?

उत्तर कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

ब्रह्मा मिश्राचा भाऊ संदीप याच्या सांगण्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या अभिनेत्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे समजलेले नाही. मिर्झापूरमध्ये मुन्ना भैय्याची भूमिका करणारा अभिनेता दिव्येंदूने इंस्टाग्रामवर त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा