27.5 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरविशेषसास भी...मधील बहु बनली सासु!

सास भी…मधील बहु बनली सासु!

Google News Follow

केंद्रीय मंत्री आणि सास भी कभी बहु थी या गाजलेल्या टीव्ही मालिकेत सुनेच्या प्रमुख भूमिकेतील स्मृती इराणी आता खऱ्या आयुष्यात सासू बनल्या आहेत. त्यांची मुलगी शैनलचे लग्न होत असून त्यासंदर्भातील फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

स्मृती इराणी यांचा विवाह जुबीन इराणी यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव जोर इराणी आहे तर मुलीचे नाव जोईश इराणी आहे. जुबीन यांना पहिल्या लग्नापासून एक मुलगी असून तिचे नाव शैनल आहे. शैनलचे आता लग्न ठरले आहे.

 

इन्स्टाग्रामवर स्मृती यांनी आपल्या या नव्या भूमिकेबद्दल लिहिले आहे. आपले जावई अर्जुन भल्ला आणि मुलगी शैनलचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

एका फोटोत शैनलचा पती अर्जुन भल्ला गुडघ्यांवर बसून तिच्या बोटांमध्ये अंगठी घालत आहे तर दुसऱ्या फोटोत शैनेल आणि अर्जुन यांच्यातील रोमँटिक क्षण टिपला आहे. या दोन्ही फोटोंवर चाहत्यांच्या उड्या पडल्या आहेत.

हे ही वाचा:

दिवंगत ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या पत्राबद्दल काय म्हणाले मोदी?

…म्हणून भोजपुरी अभिनेत्रीने केली गळफास लावून आत्महत्या

२ किलो आरडीएक्सने घडविला होता लुधियाना न्यायालयात स्फोट

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये बॉयलरच्या स्फोटात १० ठार

 

स्मृती यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकांऊंटवर पोस्ट केली आहे की, अर्जुन भल्ला याचे आमच्या अतरंगी कुटुंबात स्वागत आहे. आता तुला सासऱ्यांना सामोरे जायचे आहेच पण त्याहीपेक्षा सासु म्हणून मला. तुला आम्ही आधीच इशारा देऊन ठेवतो. देव तुझे रक्षण करो!

ही पोस्ट शेअर केल्यानंतर स्मृती इराणी यांच्यावर अभिनंदन संदेशांचा वर्षाव सुरू झाला आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यात कलाकार दिव्या शेठ शहा, मौनी रॉय यांच्यासोबत स्मृती यांची मैत्रीण असलेल्या एकता कपूर यांचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा