29.6 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरक्राईमनामासामूहिक बलात्काराने पेण हादरले; सात जणांना घेतले ताब्यात

सामूहिक बलात्काराने पेण हादरले; सात जणांना घेतले ताब्यात

Google News Follow

पेण तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. १७ वर्षीय या पीडित तरुणीला आरोपी हे सतत धमकी देऊन बलात्कार करत असत. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे तर तीन जण फरार आहेत. या अमानुष घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.

वाशी परिसरात एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या पालकांसोबत राहायची. मात्र या मुलीला मागील अनेक दिवसांपासून काही तरुण काही कारणांनी सतत धमकी देत होते. गेल्या अनेक दिवसांपासून हे तरुण मुलीला धमकी देत तिच्यावर सामूहिक बलात्कार करायचे. हा प्रकार अखेर उघडकीस आला आहे.

बलात्काराची ही घटना समोर येताच पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरु करून सात जणांना ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दिली आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

परीक्षा घोटाळा प्रकरणी कृषी अधिकारी सुशील खोडवेकर अटकेत

अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद चव्हाट्यावर

नथुरामवरील चित्रपटाचे भवितव्य

‘सुपर मार्केटमधून दारू विकण्याऐवजी प्राथमिक सुविधा द्या’

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिरुर तालुक्यात अशाच प्रकारे सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. ३२ वर्षीय विधवा महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही घटना २३ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. पतीच्या निधनानंतर संबंधित महिला एकटीच राहत असल्याचा फायदा आरोपींनी उचलला. महिलेवर १ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ या दरम्यान सामूहिक बलात्कार करण्यात आला. या बलात्कारातून पीडित महिला गर्भवती राहिल्यानंतर संबंधित घटनेचा उलगडा झाला होता.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा